Breaking

53rd ABVP vidarbha Conference : २३ जिल्ह्यांतील २३०० कार्यकर्ते अन् तरुणाईचा उत्साह!

2300 members from 23 districts joined the conference : अभाविपच्या अधिवेशनाला नागपुरात सुरुवात, गडकरी भेट देणार

Nagpur अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली. या तीन दिवसीय अधिवेशनाला २३ जिल्ह्यातून २३०० प्रतिनिधी आले आहेत. विदर्भातील शिक्षण संस्थांमध्ये अभाविपला मजबूत करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व आले आहे हे विशेष. मंगळवार, दि. २८ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते या अधिवेशनातील स्व. गुरुदेव सोरदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटनदेखील रेशीमबाग मैदानावर झाले. यावेळी स्वागत समितीच्या उपाध्यक्ष डॉ. परिणिता फुके, महानगर उपाध्यक्षा मेधा कानेटकर, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा. भागवत भांगे, महानगर सहमंत्री संदेश उरकुडे व अनुज पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Jaykumar Rawal : सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल !

व्यक्तिमत्व निर्माणातून छात्रशक्तीचा विकास हेच अभाविपचे ध्येय आहे. या तीन दिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे. ते ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी स्वत:ला राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात झोकून द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

संघभूमीत आयोजित या अधिवेशनात विशेष प्रदर्शन कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे. यात दत्ताजी डिडोळकर, माजी कार्यकर्ते स्व. अरविंद खांडेकर, सदानंद खोब्रागडे, गजाननराव कुंटे, किशोर शुक्ला, स्व. सुरेश तापस आदींची छायाचित्रे व कार्यकर्तृत्वाचा आलेख सादर करण्यात आला आहे. अभाविपमधील सहभागामुळे अनेकांच्या जीवनाला आकार मिळाला. त्यांची माहिती देखील या कक्षात प्रदर्शित करण्यात आली आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh : संघप्रणित संस्था सरकारच्या विरोधात करणार आंदोलन 

मागील काही काळापासून अभाविपच्या कार्यकर्त्यांना महत्त्व आले आहे. विशेषत: महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांना समाजजीवनात सक्रिय करत त्यांच्यातील योग्य व्यक्तीला राजकीय पटलावर आणण्यावर भर देण्यात येत आहे. यातील काही कार्यकर्ते संघात प्रचारक व विस्तारक म्हणून कार्यासाठीदेखील बाहेर निघत आहेत हे विशेष.