Hospitals in every district for pets : मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवस आराखड्याचे सादरीकरण
Mumbai राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याच्या संदर्भात उद्भवणारे प्रश्न या निमित्ताने सुटणार आहेत. सध्या राज्यात सर्वत्र पाळीव प्राण्यांसाठी खासगी रुग्णालये आहेत. मात्र बरेचदा या रुग्णालयांमधील खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे सरकारी रुग्णालय झाल्यास नागरिकांची सोय होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी प्रेझेंटेशन दिले.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांनी कॉल केला तरीही निधी मिळाला नाही
पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्झा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्याचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
53rd ABVP vidarbha Conference : २३ जिल्ह्यांतील २३०० कार्यकर्ते अन् तरुणाईचा उत्साह!
शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावे. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे. लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहिम राबवावी. बर्ड फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.