Breaking

Nitin Gadkari : राजकारण हेच समाजकारण अन् धर्मकारण!

Union Minister Nitin Gadkari conferred with ‘Dharmopasak’ award: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘धर्मोपासक’ पुरस्कार प्रदान

Nagpur राजकारण हे राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण आहे. आणि राजसत्तेला धर्मगुरूंचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आज धर्मोपासक पुरस्कार स्वीकारताना उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद देखील मिळत आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सत्काराला उत्तर दिले.

श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्ट तर्फे गणेश याग 2025च्या निमित्ताने गडकरी यांना धर्मोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांचाही सत्कार करण्यात आला.

DGCA is positive : गोंदिया-इंदूर विमानसेवा मार्चपासून?

कार्यक्रमाला पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, एमआयटी पुणेचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, संजय शास्त्री द्रविड, पराग महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, सन्मानपत्र, 11 हजार रुपये आणि पेशवाई पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारत सरकारच्या वतीने यावर्षी गणेश्वरशास्त्री द्रविड आणि ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला. या दोघांचाही गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गडकरी म्हणाले, ‘धर्मोपासक’ पुरस्कार हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. या पुरस्कारामुळे मला समाजासाठी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आजपर्यंत जे कार्य सुरू आहे. त्यात अधिक जीव ओतून जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. समाजातील शोषित-पीडित उपेक्षितांची सेवा करण्याचा संकल्प मी घेतला आहे. या संकल्पपूर्तीसाठी गुरुजनांकडून आज पुरस्काराच्या रुपात आशीर्वाद मिळाला आहे.’

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या

गडकरी म्हणाले, ‘अध्यात्मिक विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यात समन्वय साधून धर्माच्या आधारावर कृतार्थ चालविण्याचा आपला प्रयत्न आहे. नवीन पिढीवर यातून उत्तम संस्कार होतील आणि भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही.’