Three accidents on Samruddhi highway in single night:अपघातांची मालिका सुरूच; सिंदखेड राजा-मेहकर दरम्यान घटना
Buldhana समृद्धी महामार्गावर ८ फेब्रुवारी रोजी एका रात्रीत तीन वेगवेगळे अपघात घडले. सुदैवाने सर्व जण किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदखेड राजा ते मेहकर दरम्यान हे अपघात घडले.
चॅनल क्रमांक ३०२.४ वर ही घटना घडली. कार क्रमांक एमएच ३७ जी ६७७३ ट्रकवर आदळली. कार चालक उमेश प्रभाकर तिडके (३५, वाशिम) आणि त्यांच्या सोबतचे प्रभाकर रामचंद्र तिडके (७६), शुभांगी प्रभाकर तिडके (६२), आणि विश्वजित श्रीराम वाट (२२) सर्व वाशिम येथून संभाजीनगरहून वाशिमला जात असताना हा अपघात घडला. कार चालकाच्या बाजूचे मागील टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरील ट्रकवर आदळली.
यामध्ये सर्व जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चॅनल क्रमांक ३१०.०१ वर कार क्रमांक एमएच ०२ ईपी ९७०१ आणि टिप्परच्या धडकेत घडला. यामध्ये शशिकांत गोविंदभाई रोहित (३८, जोगेश्वरी, मुंबई) आणि त्यांच्यासोबतचे सागर रमेशभाई पाटील (४१), नमिता सागर पाटील (४१), दीपक रमेशभाई पाटील (४४), आणि जियाल सागर पाटील (१०) सर्व वलसाड येथून नागपूरला लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला.
समोरील टिप्परने अचानक ब्रेक लावल्याने कार टिप्परवर जाऊन आदळली. यामध्ये सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चॅनल क्रमांक ३१३.१ वर पहाटे ५ वाजता कार आणि ट्रकच्या धडकेत घडला.
Hostel for OBC students : ६०० विद्यार्थ्यांवर संकट; ‘आधार’च हिरावला !
कार क्रमांक एमएच १४ केजे ९९४५ चा चालक घनश्याम सुधाकर कोलते (३२, अमरावती) आणि त्यांच्यासोबतचे पूनम घनश्याम कोलते (२४), वरद घनश्याम कोलते (४), गणेश मुरलीधर बोंडे (४६), श्यामबाला गणेश बोंडे (४०), आणि हितेश गणेश बोंडे (१२) सर्व आनंदहून अमरावतीला जात असताना हा अपघात घडला. समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. यामध्ये सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.