The budget of Amravati University will be presented on March 11 : अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होणार
Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गेल्या वर्षी खर्च आणि उत्पन्नात तफावत असल्याने तुटीचे अंदाजपत्रक सादर करावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विद्यापीठाचा अर्थसंकल्प ११ मार्चला अधिसभेत सादर केला जाणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सर्व विभागांकडून अर्थसंकल्पीय प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.गतवर्षी विद्यापीठाचा अर्थसंकल्प २९२ कोटी २१ लाख ८७ हजार ५९० रुपये इतका होता.
Bachhu Kadu : बच्चू कडू यांच्या गटावरील अविश्वास प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !
विद्यापीठाला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नियमित अनुदान मिळते. तसेच महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कांच्या माध्यमातूनही उत्पन्न प्राप्त होते. मात्र, गेल्या वर्षी खर्च आणि उत्पन्नात तफावत असल्याने तुटीचे अंदाजपत्रक सादर करावे लागले होते. विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेच्या या अर्थसंकल्पीय घडामोडींमुळे दोन्ही संस्थांच्या आर्थिक नियोजनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dharmapal Meshram : राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा !
जिल्हा परिषदेतही तयारी..
दरम्यान, जिल्हा परिषदेचाही अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वित्त व लेखाधिकारी अश्विनी मारणे यांनी १४ विभागांकडून मागणी प्रस्ताव मागवले आहेत. महिनाअखेरपर्यंत सर्व विभागांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अंतिम अर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे.