One killed in an accident on Samruddhi Highway : पुण्यातून अमरावतीच्या दिशेने निघाली होती बस
Washim पुण्यावरून अमरावतीकडे निघालेल्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर वनोजा टोल प्लाझाजवळ अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात अलीम खान कादर खान (वय ४४, रा. दूधगाव, ता. दारव्हा) यांचा मृत्यू झाला, तर २० प्रवासी जखमी झाले. यापैकी ४ ते ५ गंभीर जखमी प्रवाशांना तात्काळ अकोला येथे हलवण्यात आले आहे.
एमएच १४ एचजी ६६६७ क्रमांकाचे खासगी प्रवासी वाहन समृद्धी महामार्गावर पुण्याहून अमरावतीकडे जात होते. वनोजा टोल प्लाझापासून ५ किमी अंतरावर चॅनल २१५वर वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या परिवारास दु:ख झाले आहे.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचा CCI कडे खरेदी व चुकाऱ्यांसाठी आग्रह!
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांनी आमदार श्याम खोडे यांना कळवले. आमदार खोडे यांनी पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सूचना देऊन तात्काळ मदत पाठविण्याच्या आदेश दिले.
घटनास्थळी आमदार खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मंगरुळपीर तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुधाकर आढे आणि पीएसआय दिनकर राठोड यांनी मदत कार्याचा आढावा घेतला. पुढील तपास मंगरुळपीर पोलिस करत आहेत.
Murder attempt in Nagpur : मला एक आवाज येतोय… कुटुंबाला संपवून टाक!
मदत कार्यात शेलूबाजार येथील पांडुरंग कोठाळे, साईश्रध्दा योगा ग्रुप, वनोजा येथील आदित्य इंगोले, शुभम हेकड, गोपाल राऊत यांच्यासह कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्था, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था आणि गुरु मंदिर संस्थेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकांचे समन्वयाने कार्य सुरू करण्यात आले