Breaking

Uddhav Thackeray : काय..! तुम्ही मर्सीडीजचे भाव वाढवले नाहीत ?

 

Uddhav Thackeray’s taunt to Fadnavis : उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर मिश्कील टोलेबाजी

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज (१० मार्च) महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२५-२६चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह उद्या, मंगळवारपर्यंत तहकूब केलं. तेथून परत जात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली.

एक मिनीटापेक्षाही कमी वेळ झालेल्या या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार या दोघांवरही मिश्कील टोलेबाजी केली. बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेतीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गॅलरीत होते. यावेळी दानवनेंनी फडणवीसांसोबत हस्तांदोलन केले. याच वेळी ‘काय..! तुम्ही मर्सीडीजचे भाव वाढवले नाहीत ?’, असा प्रश्न करून ठाकरेंनी फडणवीसांना मिश्कील टोला लगावला.

Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन

मुख्यमंत्री फडणवीस स्मितहास्य करीत तेथून लगेच निघून गेले. ठाकरेंच्या या टोल्याला नजिकच्या काळात घटलेली एक घटना कारणीभूत आहे. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सद्यस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेल्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी उद्धव टाकरेंवर गंभीर आरोप केला होता. ‘असे घडलो आम्ही..’, या कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सीडीज दिल्या की, एक पद मिळायचं’, असा आरोप केला होता.

या आरोपानंतर ठाकरेंच्या सेनेतील एक-एक सैनिक चांगलाच संतापला होता. गोऱ्हे यांनी आतापर्यंत किती पदे उपभोगलीत आणि त्यांनी किती मर्सीडीज दिल्या, याचा हिशेब त्यांना विचारण्यात आला होता. त्यानंतर डॉ. गोऱ्हेंवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचीही तयार ठाकरे गटाकडून सुरू असल्याची माहिती आहे. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी आज फडणवीसांना टोला लगावला.

Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!

फडणवीसांच्या पाठोपाठ अजित पवारही तेथेच आले आणि त्यांचीही उद्धव ठाकरेंशी भेट झाली. त्यावेळी ‘हा तुमचा अर्थसंकल्प नाही’, असे म्हणत ठाकरेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला. भाजपच्या दबावाखाली अजित पवारांनी हा अर्थसंकल्प सादर केला, असे ठाकरे यांना म्हणायचे होते, असा त्याचा अर्थ काढण्यात आला. यावेळी अजित पवारांनीही फडणवीसांचाच कित्ता गिरवला आणि हसत तेथून निघून गेले.

Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!

 

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तेथूनच गेले. पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. ठाकरेनी त्यांच्याकडे पाहण्याचे टाळले. पण त्यापूर्वी ठाकरेंनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका केली होती. भागवत जर कुंभमेळ्यात गेले असते तर मीही गेलो असतो. त्यांनी जेथे डुबकी लावली, तेथे मीही डुबकी लावली असती, असे म्हणत भागवतांवर टिका केली. तर काही लोक जाऊन दाढी बुडवून आले, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला होता.