The thief stole the judge’s wallet : भाजीबाजारातील कारनामा; नऊ हजार रुपये रोख, कागदपत्रे गायब
Wardha भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या न्यायाधीशांचेच पॉकीट चोरट्याने लंपास केले. ही घटना येथील आरती चौकातील एका शाळेजवळील भाजीबाजारात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आपण कुणाच्या पाकिटावर हात मारतोय, याची माहिती चोरांना नसावी. पण आता न्यायाधिशांसोबत हा प्रकार घडल्याने पोलिसांनी मनावर घेतले आहे.
तक्रारकर्ते न्यायाधीश तिवसा न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते तिवसा येथून वर्धा येथे आले. नंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते आरती चौकातील एका शाळेसमोरील भाजीबाजारात भाजीपाला घेण्यास गेले. तेथे थोडी फार गर्दी होती.
भाजीपाला विकत घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी पॅन्टच्या खिशातील पाकीट काढण्यास गेले असताना पाकीट आढळले नाही. त्यांनी आजूबाजूला बघितले. नंतर पाकीट कोणी तरी अज्ञात चोरट्याने काढल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी शर्टातील खिशातील पैसे काढून भाजीपाला विक्रेत्याला दिले. तेथे गर्दी असल्याने त्यांना कोणावर संशयही घेता आला नाही.
Chandrashekhar Bawankule : पश्चिम विदर्भाची हवाई connectivity वाढणार!
न्यायाधीशांच्या चोरी गेलेल्या पॉकिटात महत्वाचे कागदपत्रे आणि रोख नऊ हजार रुपये होते. त्यांचे ओळखपत्र, चालक परवाना, आधारकार्ड, दोन एटीएम कार्ड, दोन क्रेडीट कार्ड, पासपोर्ट फोटो, आदी कागदपत्रे त्यात होती. भाजीपाला दुकानावरील गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे पाकीट चोरी करण्यात आले. त्यांनी रविवारी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.