The Chief Minister Devendra Fadanvis is being targeted by people close to him said Vijay Wadettiwar : ३०० वर्षांपूर्वीची कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा?
नागपुरात खरंच प्रतिकात्मक कबर जाळण्याची गरज होती का? या घटनेमागे जर सत्ताधारी वातावरण दूषित करत असतील. तर त्यांनी औरंगजेबाच्या नावाने मते मिळवायची असल्यानं कदाचित अशी भूमिका स्वीकारली असेल, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दुसरं तिसरं कुणी नाही, तर त्यांच्या जवळचेच लोक टार्गेट करत असल्याचा बॉम्ब त्यांनी फोडला.
नागपुरात हिंसाचार झालेल्या भागात काँग्रेसच्या समितीला जाण्यास परवानगी नाकारली. आम्ही हिंसाचार करायला नाही तर शांतता प्रस्थापित करायला जात होतो. पोलिसांवर दबाव होता. आता तपास पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बोलणार नाही. दंगळखोल दोन्ही बाजंनी माणस बाहेरची होती. नागपूर अशांत करण्याचा हा प्रयत्न आहे. पण असे असले तरी पोलीस झोपा काढत होते का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Harshawardhan Sapkal : कोरटकर पळून गेला, आता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा !
ही दंगल पूर्वनियोजित होती तर पोलिसांना सुगावा का लागला नाही? ते गाफील कसे राहिले, असे प्रश्न करत आमच्या समितीला त्या भागात जाऊन पाहणी करू द्यावी. दंगलीत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. शहाराबाहेरून लोक आल्याची माहिती आहे, पोलिसानी ते शोधून काढले आहे. त्यामुळे आता पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !
औरंगजेबाच्या कबरीला जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. पुन्हा कुणी स्वराज्यावर चालून येण्याची हिंमत करू नये म्हणून महाराजांनी त्याची कबर बांधली. शत्रू संपला की शत्रुत्वही संपलं, अशी सूचना मॉ जिजाऊंनी राजेंना केली होती. त्यानंतर महाराजांनी औरंगजेबाची कबर बांधली. ती कबर म्हणजे महाराजांच्या मोठ्या मनाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.