Breaking

Arvi : कपाशीची बोंड खाल्याने ११ जनावरे ठार

11 animals killed by eating cotton bolls : आर्वीतील घटना; पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण

Wardha जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कपाशीची बोंडे खाल्याने ११ जनावरे ठार झाली. ही घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह तालुक्यातील पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच शेतकरी विविध संकटांच्या विळख्यात सापडलेला आहे. अशात जनावरांवर आलेले संकट नवी डोकेदुखी ठरले आहे.

शेतमालाला भाव, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिकविमा अशा अनेक समस्यांचा आधीच शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. अशात पशुपालनाचा एक मोठा आधार शेतकऱ्यांना आहे. पण, आता त्यावरही संकट घोंघावू लागले आहे. पशुपालकांनी या घटनेची धास्ती घेतली आहे. जनावरांवर नजर ठेवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. एकूणच परिस्थिती शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढविणारी आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

Nitin Gadkari : टॉयलेट बांधण्यासाठीच परवानगी घेणे बाकी राहिले आहे

आर्वीतील पंचवटी परिसरात ही घटना रविवारी (दि. ५ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. आर्वीचे शेतकरी जानराव वहाने, सुधाकर वहाने, दिनेश बर्डे या शेतकऱ्यांच्या जनावरांचा कपाशीची बोंडे खाल्ल्याने मृत्यू झाला. पंचवटी परिसरात दीडशेच्या आसपास जनावरे कपाशीची बोंडे खाल्ल्याने आजारी पडल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे या भागात आपली जनावरे चराईसाठी सोडली होती.

शेतातील कपाशीची बोंडे खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली, अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर जनावरे आजारी पडली. त्यातील ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐन हंगामात जनावरे दगावल्याने अनेकांवर संकट ओढवले आहे. त्यांच्यासमोर प्रश्नच्रिन्ह निर्माण झाले आहे. शासनानकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शासनाकडे मदतीची मागणी
कपाशीची बोंड खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू होणे, ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे ज्यांच्या जनावरांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे, त्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारकडे शेतकऱ्यांचे आधीच इतर विषय प्रलंबित आहेत. आता या नव्या समस्येवर सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.