Breaking

Mother Leopard : बछड्यासाठी कासावीस झाली बिबट !

After 24 hours, the leopard cub that fell in the well was pulled out : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला २४ तासानंतर काढले बाहेर

Khamgaon तालुक्यातील निराेड शिवारात विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने २४ तासानंतर बाहेर काढले. बछड्याला बाहेर काढताच बछड्याला कवटाळण्यासाठी बिबट मादीने पिंजऱ्याच्या दिशेने धूम ठोकली. हे दृष्य बघून वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह सारेच भारावले. वन्यप्राण्यामधील मातृत्वाच्या भावनेचे पुन्हा एकदा या प्रसंगातून दर्शन झाले.

खामगाव तालुक्यातील निरोड शिवारात महादेव रावणकर यांचं शेत आहे. त्यांच्या शेतातील २० ते २५ फूट खोल विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची घटना उघडकीस आली. वन विभागाला त्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाण्यातील रेस्क्यू टीम तेथे पोहोचली. या पथकाने विहिरीत पडलेल्या ४ महिन्यांच्या मादी बिबटला पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढले. बचाव पथकाने यासाठी खूप प्रयत्न केले, त्यानंतर यश मिळाले.

Nitin Gadkari : उपेंद्र शेंडे यांनी संकटातही तत्वांशी तडजोड केली नाही !

त्यानंतर खामगाव येथे नेऊन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. बछडा सुदृढ असल्याचे समोर आले. त्यामुळे बुलढाणा उपवनसंरक्षक सरोजा गवस व सहायक वनसंरक्षक अश्विनी अपेट यांनी आईपासून ताटातूट झालेल्या पिलाला परत पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मादी बिबट व आईची रात्री बाराच्या सुमारास भेट झाली. त्यावेळी मातृत्व ओसंडून वाहण्याचा प्रसंग सर्वांना अनुभवता आला.

मादी बिबटने घेतले बछड्याला जवळ
रात्रीच्या किर्रर्र अंधारात चार महिन्यांच्या मादी बिबटने पिंजऱ्यातूनच आईचा शोध सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरात फिरत असलेल्या आईला पाहताच त्याच्यात अवासन आले. ते पिंजऱ्याच्या बाहेर आले. तोच मादी बिबटने त्याला जवळ घेतले आणि दोघांनीही जंगलाचा रस्ता धरला.

वन्य प्राणी विहीरीत पडण्याच्या घटना वाढल्या
जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. तसेच अंबाबरवा अभयारण्य देखील आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये शेतातील विहीरीत वन्य प्राणी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. वनविभागाकडून वन्य प्राण्यांसाठी विशेष माेहिम राबवण्यात येते. त्यानंतर या प्राण्यांना जंगलात साेडण्यात येते. बिबटच्या बछड्याला वनविभागाने २४ तासातच बाहेर काढले. काही दिवसांपूर्वी राेहीलाही वनविभागाने जीवनदान दिले हाेते. बिबट्याला वाचवताना वनविभागाला माेठी कसरत करावी लागली हाेती.