Issue of 832 teachers transfers to their home districts is clear : अनेक वर्षे प्रलंबित होता प्रश्न; जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा निर्णय
Gondia इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या ८३२ प्राथमिक शिक्षकांना अखेर त्यांच्या गृह जिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती सुरेश हर्षे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची बिंदूनामावली (सिनिऑरिटी लिस्ट) शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अद्ययावत नसल्याने ते बदलीस पात्र ठरत नव्हते. त्यामुळे गृह जिल्ह्यात येण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून अडथळ्यात होती. शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवूनही या समस्येवर तोडगा निघत नव्हता. मात्र, सुरेश हर्षे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित विभागाला बिंदूनामावली पूर्ण करून शासनाच्या बदली पोर्टलवर अपलोड करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
Gondia Bridge reconstruction : बाघ नदीवरील जीर्ण पुलाचा होणार कायापालट!
या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत प्राथमिक शिक्षण विभागाने विहित मुदतीत रोस्टर तयार केले आणि १०० टक्के बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड केली. परिणामी, इतर जिल्ह्यांमध्ये नोकरी करत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्रता प्राप्त झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात सध्या १०१४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३५४७ शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी केवळ २७१५ पदेच भरलेली असून, ८३२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत होती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत होते. आता ही रिक्त पदे गृह जिल्ह्याच्या शिक्षकांनी भरली जाणार असल्याने शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.
Gondia administration : आमगावमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईवरून वाद!
सुरेश हर्षे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने घेतलेला हा सकारात्मक निर्णय म्हणजे शिक्षकांसाठी मोठा दिलासा असून, शिक्षण क्षेत्रातील एक मोठी अडचण दूर झाली आहे. या निर्णयामुळे केवळ शिक्षकांनाच नव्हे, तर विद्यार्थ्यांनाही फायदा होणार असून, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात नवा ऊर्जा संचार झाला असून, शिक्षकांचा आत्मविश्वासही वाढला आहे.