Breaking

Chandrashekhar Bawankule : विमानसेवा ठरणार विकासासाठी बुस्टर डोज!

 

Amravati Airport will be a booster dose for development : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची ६०वी पुण्यतिथी

Amravati शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त, अमरावती शहरासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येत आहे. १६ एप्रिलपासून अमरावतीहून विमानसेवेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमामुळे पश्चिम विदर्भाच्या विकासाला नवे दालन खुले होणार आहे. डॉ. देशमुख यांचे स्वप्न साकार होत असल्याची भावना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. “१६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. या पहिल्या विमानाने मुख्यमंत्री अमरावतीत दाखल होणार असून, मी स्वतः त्यांच्यासोबत असणार आहे,” असे त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यात दिल्लीसह विविध शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

बावनकुळे म्हणाले, “मी स्वतः कोरडी येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलेलो आहे. ही संस्था माझीच आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची परतफेड समाजातील प्रत्येकाने केली पाहिजे. त्यांच्या कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.” तसेच, “भारत सरकारकडून डॉ. देशमुख यांना भारतरत्न मिळावा यासाठी सुलभा खोडके, प्रवीण तायडे, पंकज भोयर यांच्या सहकार्याने राज्य शासनाकडून प्रस्ताव पाठवला जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankude : मुंबईतील बनावट नकाशे दाखवून केलेली बांधकामे निष्कासित होणार !

या कार्यक्रमाला राज्य शिक्षणमंत्री पंकज भोयर, खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.