NCP to try its luck in Nagpur Municipal Corporation elections : नागपुरात धडपडतेय राष्ट्रवादी; महापालिका निवडणुकीची तयारी
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर इच्छुकांना घुमारे फुटायला लागले आहेत. त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये आता जागांसाठी रस्सीखेच होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर महानगरपालिकेसाठी कंबर कसली आहे. पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘विकासाचा वादा… अजितदादा’ ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या पक्षात कार्यकर्तेच शोधून सापडतील, त्यांच्या यात्रेतील यात्रेकरू कोण असणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) या पक्षाकडे अद्यापही हवे तसे कार्यकर्ते व संघटन नाही. मात्र तरीदेखील येथील पदाधिकारी मात्र मोठमोठे दावे करण्यात व बाते मारण्यातच आघाडीवर आहेत. पक्षातर्फे पुढील आठवड्यापासून शहरात ‘विकासाचा वादा… अजित दादा’ या बॅनरखाली यात्रा काढली जाणार आहे. जनतेत पोहोचण्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते तरी आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Zero Mile : अखंड भारताचा केंद्रबिंदू ‘झिरो माईल’ ठरणार आकर्षणाचे केंद्र !
महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होताच नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपकडे किमान ४० जागांची ‘डिमांड’ करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. भाजप आपल्याला हलक्यात घेऊन सन्मानजनक जागा देणार नसेल तर स्वबळावर मैदानात उतरून लढा देण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.
मात्र स्वबळावर पक्ष दोन तरी जागा जिंकू शकेल का याची शाश्वती पदाधिकाऱ्यांनाच नाही. पक्षाचे शहराध्यक्ष केवळ प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येतात. मात्र टीव्हीवर बाईट देणे आणि प्रत्यक्ष जनतेच्या समस्या सोडवून तळागाळात विश्वास निर्माण करणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे. जर अजित पवार यांच्या कार्यशैलीचे थोडेफार पालन जरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले तर ते स्वबळाची भाषा करू शकतात, असाच सध्या सूर आहे.
India – Pakistan War : युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येकाने घ्यावे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !
दरम्यान, भाजपकडून प्रतिसाद मिळेपर्यंत स्वबळाची तयारी सुरू ठेवली जाईल. प्रत्येक प्रभागात चार तगडे उमेदवार शोधून त्यांची यादी तयार केली जाईल, अशी रणनीती बैठकीत ठरली आहे. हा ठराव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विदर्भ संपर्कप्रमुख प्रफुल्ल पटेल, नागपूर जिल्हा निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्याकडे पाठविला जाणार आहे.