Breaking

Amol Mitkari : कालपर्यंत वेटिंगवर होते, आता थेट गृहमंत्री!

MLA will play role of home minister in upcoming movie : अमोल मिटकरींची लागली लॉटरी, मोठी ‘भूमिका’ निभावणार

Akola राजकारणात मंत्रीपदासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना अखेर गृहमंत्रीपद मिळालंय. कालपर्यंत वेटिंगवर असलेले मिटकरी थेट गृहमंत्री होणार असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. राजकारणात एवढी मोठी लॉटरी लागण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. त्यामुळे मिटकरींची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.

‘बिल्लोरी’ या आगामी मराठी चित्रपटात अमोल मिटकरी राज्याचे गृहमंत्री आप्पासाहेब पाटील यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही भूमिका त्यांच्यासाठी पडद्यावरची आहे. पण खऱ्या आयुष्यात गृहमंत्री होण्याची देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण त्यांना गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचायचे असेल तर अजितदादाच DCM Ajit Pawar दिग्दर्शक असणार आहेत, हेही तेवढेच खरे.

Justice Bhushan Gawai : अमरावतीचे सुपूत्र ठरणार ५२वे सरन्यायाधीश!

‘सदगुरू इंटरप्रायझेस’ प्रस्तुत आणि दिग्दर्शक सुनील शिरसाठ दिग्दर्शित या चित्रपटात आमदार अमोल मिटकरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. निर्माता प्रशांत मानकर यांच्या नेतृत्वात ‘बिल्लोरी’ चित्रपटाचे शुटिंग मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडले. आता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, नुकतेच अकोल्यात त्याचे पोस्टर लॉन्च करण्यात आले.

चित्रपटातील गाड्यांचा ताफा, पोलिसांचा सॅल्युट आणि मंत्रिपदाचा भास असा अनुभव घेताना अमोल मिटकरी भावुक झाले. ते म्हणाले, “खऱ्या आयुष्यातही गृहमंत्री होण्याची इच्छा आहे. मात्र एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजितदादांनी आमदार केलं, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आणि त्यांचे उपकार मी विसरणार नाही.”

Raju Shetti : महायुतीच्या जाहीरनाम्याविरोधात कोर्टात जाणार

मे 2020 मध्ये अजित पवारांनी अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर आमदार करून धक्कादायक वळण दिलं. शिवव्याख्याते ते विधानमंडळातील दमदार आवाज अशी त्यांची राजकीय जडणघडण झाली. मंत्रीपदासाठी अनेकदा चर्चेत राहिले तरी त्यांना अजून प्रत्यक्ष संधी मिळालेली नाही. मात्र ‘बिल्लोरी’मधील भूमिकेमुळे ते प्रथमच मोठ्या पडद्यावर मंत्री म्हणून झळकणार आहेत.