Breaking

Anil Deshmukh : भांडण विकोपाला गेलं की ‘ते’ दिल्लीत जातात, नंतर…

Politics over Eknath Shinde’s Delhi visit : VVPAT आवश्यक केवळ ईव्हीएमच्या भरवशावर निवडणुका घेऊ नये

Nagpur : एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या येवढ्यात वाढल्या. त्यावरून महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे दिसू लागले आहे. यावरून विरोधकही सातत्याने टिका करत आहेत. यातच आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही टिका केली आहे. महायुतीचे आमदार आम्हाला भेटतात. तिन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू असल्याचे ते खासगीत सांगतात. भांडण विकोपाला गेलं की दिल्लीत जातात. नंतर १० दिवसांनी पुन्हा वाद होतो, असे ते म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये VVPAT असणे आवश्यक आहे. ईव्हीएमवर आरोप झाल्यानेच VVPAT आणण्यात आले होते. आता VVPAT शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येमार नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या भरवशावर निवडणुका घेऊ नका, असे अनिल देशमुख यांनी सुचवले आहे. अमेरिकन इंटलीजन्सचे प्रमुख आणि भारतीय तज्ज्ञ यांनी सांगितलं आहे की, EVM मशीन्स हॅक होऊ शकतात.

Dispute in Mahayuti : भाजप आमदार शिंदेंच्या आमदारांवर तुटून पडले !

अनेक मतदारसंघात बनावट EVM लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्याव्या, अशी आमची मागणी आहे. EVM घोटाळा काही काही मतदारसंघात झाला. लोकसभेत ४०० जागा येणार असल्याचा अति आत्मविश्वास त्यांना होता म्हणून घोटाळा केला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत घोळ केला. हे सरकार EVM मुळे आल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

Anil Deshmukh : राज्यभरात ‘मंडल’ पोहोचवणार ‘कमंडल’;ची माहिती; शरद पवार करणार उद्घाटन !

ओबीसींचा राष्ट्रीय मेळावा गोवा येथे होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात हा मेळावा होतो आहे. देशभर त्यांचे मोठे काम आहे. भाजपने कमंडल यात्रा काढली होती, हा प्रश्न या मेळाव्यात विचारला पाहिजे. जातिनिहाय जनगणना व्हावी ही महाविकास आघाडीची मागणी होती. शरद पवार, राहुल गांधी यांनी ही मागणी केली होती. मात्र त्यावर भाजप ब्र शब्द काढत नव्हती. त्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर आरोप केले. पण महाविकास आघाडीने ही मागणी लाऊन धरली होती, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.