Breaking

Bacchu Kadu : कर्जमाफीची समिती दिशाभूल करणारी; बच्चू कडूंचा आरोप

The committee appointed regarding loan waiver is misleading : थातुरमातुर उत्तरं देत असल्याची टीका, २४ जुलैला चक्काजामचा इशारा

Amravati राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती नेमल्याचा दावा केला असला, तरी ती समिती केवळ लोकांच्या रोषावर पाणी फेरण्यासाठी आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. “ही समिती कर्जमाफीसाठी काही ठोस उपाययोजना करते की नाही, हेच स्पष्ट नाही. सरकारकडून केवळ थातुरमातुर उत्तरं दिली जात आहेत,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.

“आता वेळ आली आहे सरकारला खरी ताकद दाखवण्याची!” असे ठाम मत व्यक्त करत बच्चू कडू यांनी २४ जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरावे, सरकारला जाग आणावी, असे आवाहन केले.

Governor of Maharashtra : ‘सप्रेम भेट योजना’ सुरू करा; विवाहवंचित तरुणांसाठी राज्यपालांना साकडे

शेतकऱ्यांना केवळ घोषणा नको आहेत, त्यांना प्रत्यक्ष कृती हवी आहे. आजवर अनेक आश्वासने देऊन सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे, असा आरोप करत बच्चू कडू म्हणाले की, “समित्यांची नेमणूक करून सरकार वेळकाढूपणा करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक वेळ दुर्लक्षित राहिले, तर संतप्त लोकक्षोभ उफाळून येईल.”

“चला, एकत्र येऊया… चक्काजाम यशस्वी करूया!” अशा शब्दांत त्यांनी जनतेला आवाहन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक ठरेल, असेही ते म्हणाले.

Indian Railway : आजपासून धावणार ‘काचीगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस’!

या चक्काजामच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांची तीव्रता अधोरेखित होणार आहे. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आता सरकारने गंभीरपणे विचार करून तातडीने कर्जमाफीसह इतर मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांवरून होत आहे.