Breaking

Bahujan samaj party : बसपाच्या केंद्रीय प्रभाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांना थेटबोल!

 

The central in-charge of the BSP said, “Don’t do things that will harm the party” : पक्षाच्या मिशनला नुकसान होईल असे काम करू नका

Nagpur बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश केंद्रीय प्रभारी व माजी खासदार राजाराम यांनी शहरातील पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. काहीही झाले तरी पक्षाच्या मिशनला नुकसान होईल असे काम करू नका असे परखड बोल त्यांनी सुनावले.

मागील काही निवडणूकांमध्ये बसपाचा आलेख खाली घसरलेला दिसला. पक्षाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
केंद्रीय प्रभारी माजी खासदार राजाराम यांनी शुक्रवारी सकाळी नागपुरात नागभवन येथे बसपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे उपस्थित होते.

Uddhav Balasaheb Thackeray : गाव असो वा गल्ली, शिवसेनेची शाखा पाहिजेच!

चुका प्रत्येकाकडून होत असतात. आपण मिशनचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मिशनला नुकसान होईल, असे कुठलेही काम करू नका, तसे वागू नका. ज्याची चूक होत असेल त्याच्या नजरेत ती आणून द्या व त्याला ती दुरुस्त करण्याची संधी द्या. हे करत असताना अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक समाजाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असे राजाराम म्हणाले.

यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राची सहा झोनमध्ये विभागणी केली आहे. पक्षाचे काम ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार चालेल. पक्षाकडून आलेले निर्देश प्रत्येकाला पाळावे लागतील व त्यानुसारच काम करावे लागेल, असेही त्यांनी कडक शब्दात सुनावले. स्वतःची बुद्धी, पैसा व शक्ती वापरून पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Nagpur police : ‘रिल्स बघू नको’ म्हटल्यामुळे मुलगा घर सोडून गेला !

याप्रसंगी प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, मीडिया प्रमुख उत्तम शेवडे, नागोराव जयकर, मंगेश आकरे, मोहन रईकवार, रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, योगीराज लांजेवार, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, जितेंद्र घोडेस्वार, वर्धेचे जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाणे, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, अभिलेष वाहने, बुद्धम राऊत, भानुदास ढोरे, जीवन वाळके आदी उपस्थित होते.