Students are facing exam and study tension :
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता रुजविणे आवश्यक
Wardha तणाव आणि चिंता हा आजच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. तणाव किंवा टेन्शन फक्त मोठ्यांनाच येते असे नाही, तर ते लहान मुलांनाही येते. विशेष म्हणजे परीक्षा जवळ आल्यावर मुला-मुलींचे टेन्शन वाढते. यातून योग्य समुपदेशन व मार्गदर्शन न मिळाल्याने काही मुले-मुली आत्महत्येचा मार्ग पत्करतात. अशावेळी पालकांनी पाल्यांबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. मुला-मुलींशी नेहमी संवाद साधवा, त्यांना बोलते करावे. त्यांच्या भावना व इच्छा-आकांक्षा जाणून घ्यावात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहेत.
अभ्यास करताना एक ते दीड तासानंतर १५ ते २० मिनिटाचा ब्रेक घ्यावा. कंटाळवाणे वाटल्यास मोकळ्या वातावरणात थोडेसे फिरून यावे. सतत अभ्यास करून डोक्यावर ताण येत असल्याने मध्येमध्ये आवडीच्या गोष्टी कराव्यात.
दुसऱ्या कोणत्या कारणावरून टेन्शन आले तर त्या विषयावर तज्ज्ञांशी बोलून त्यातून मार्ग काढता येतो. त्यामुळे पालकांनी मुलांसह संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.
मुला-मुलींना परीक्षेचे व अभ्यासाचे टेन्शन येणार नाही. याबाबत आई-वडिलांनी, तसेच कुटुंबीयांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
अभ्यासाच्या दडपणाखाली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या नसल्या, तरी परीक्षेचा तणाव डोक्यावर असतोच. दहावी, बारावी तसेच जेईई, नीट, आदींसह इतर स्पर्धा परीक्षांत अपयश येण्याच्या भीतीने अनेकदा विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग पत्कारतो.