Breaking

Bodhgaya agitation starts from Nagpur : बोधगया महाविहार मुक्तीसाठी जीव गेला तरी बेहत्तर

Buddhist demand full control over bodh gaya temple committee : भदंत अशाेक लामा यांची भूमिका, आंदोलनासाठी नागपुरातून एकत्रीकरण

Nagpur बोधगया महाविहार मुक्ती आंदाेलनात काही लाेक फूट पाडण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे शिबिर नाही, लढाई आहे. प्रसंगी विष घ्यावे लागले तरी चालेल. मी नागपुरातून विश्वास देताे. सरकार, प्रशासनाने गळे कापले तरी आणि जीव द्यावा लागला तरी महाविहार मुक्तीचे आंदाेलन थांबणार नाही, असा निर्धार भदंत अशाेक लामा यांनी व्यक्त केला.

बौद्धगया महावकास मुक्ती आंदोलनासाठी नागपुरातून एकत्रीकरण सुरू आहे. महाबाेधी महाविहार मुक्ती आंदाेलनांतर्गत रविवारी बेझनबाग, इंदाेरा येथील मैदानात विशाल जनसभा घेण्यात आली, ज्यामध्ये हजाराे बाैद्ध अनुयायी सहभागी झाले हाेते. यावेळी ऑल इंडिया बुद्धिस्ट फाेरमचे महासचिव भदंत अशाेक लामा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. राजकीय सहकार्याशिवाय आंदोलन समोर नेण्याचा सूर दिसून आला.

People’s republican party : केवळ घोषणा पुरेशा नाहीत, मनपा निवडणुकीत जागाही द्या

अशाेक लामा यांनी सांगितले, ९ मेदरम्यान भारत-पाकिस्तान युद्धाची स्थिती निर्माण झाली हाेती. त्यावेळी प्रशासनाने केलेली विनंती आणि परिस्थिती पाहता आम्हीही आंदाेलन थाेडे संथ केले. मात्र, युद्धस्थिती निवळताच पुन्हा आंदाेलनाला उभारी दिली. प्रशासनाने त्यानंतर थांबविण्याचा प्रयत्नही केला, पण आंदाेलन थांबले नाही आणि महाविहार मुक्त हाेईपर्यंत थांबणारही नाही, असा विश्वास त्यांनी दिला.

न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्याचा विचार झाला. मात्र आम्ही भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दाखल केलेली याचिकाच पुढे रेटली. या याचिकेवर १२-१३ वर्षांपासून सुनावणीच झाली नव्हती. आमच्या प्रयत्नाने आता १६ मे राेजी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता २९ जुलै राेजी अंतिम सुनावणी हाेणार आहे, असे सांगत तीन महिन्यांत महाबाेधी महाविहार मुक्त करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Collector Office : आता लोक केंद्रांवर नाही, तर सेतू केंद्र गावांत जातील !

कुणी कितीही आराेप केले तरी नागपूरची बाैद्ध जनता साेबत राहिली. येथील लाेक सतत आंदाेलनात सहभागी हाेत आहेत. नागपूरकरांनी आमचे नाक शाबूत ठेवल्याची भावना आकाश लामा यांनी व्यक्त केली. आम्ही चिमणीसारखे आंदाेलन पुढे नेत आहाेत. नागपूरकरांची अशीच साथ मिळाली तर लवकरच १९४९ चा पीटी ॲक्ट निरस्त हाेईल, असा दावाही त्यांनी केला.