Breaking

Kite Festival : तर एका झटक्यात होईल जीवाचा ‘ओ काट’!

Carelessness while flying a kite can result in loss of life : जास्त ढिल पडू शकते महागात; विजेच्या तारांवर २५ हजार होल्टचा झटका

Nagpur Kite Festival : पतंग महोत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. ‘उडी उडी रे पतंग मेरी उडी रे म्हणत, तसेच ओ.. काट’ ची हाक देत उडणाऱ्या पतंगीसोबत आनंदही गगणात मावेनासा होतो. मात्र हा आनंद साजरा करताना आता शहरात मेट्रोच्या २५ हजार होल्टच्या विजेच्या तारा आहेत, याचे भान ठेवावे लागणार आहे. अन्यथा एका झटक्यात जीवाचा ‘ओ काट’ होण्याची शक्यता नाकारता येतणार नाही.

विजेच्या तारांमध्ये यात पतंग अडकली तर पतंग उडविणाऱ्यांपर्यंत याचा करंट पोहोचू शकतो. त्यात त्याचा कोळसा होऊ शकतो, असा इशाराच महामेट्रोने दिला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आकाशात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविताना दिसून येतात. लहानांपासून ते मोठेही या उत्सवात सहभागी होतात. मकरसंक्रांतीला तीळगुळाबरोबरच पतंगांचे वैशिष्ट्ये मानले जाते. मात्र पतंग उडविताना आपली पतंग कटू नये यासाठी मांजाचा वापर केला जातो. आपली पतंग कटू नये यासाठी मांजाचा वापर करणाऱ्यांनी जीवनाची पतंग कायमस्वरूपी कटू नये याची खबरदारी घेण्याचा इशारा महामेट्रोने दिला आहे.

Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?

असे होऊ शकतात अपघात
मेट्रो ट्रेनचे संचालन २५००० व्होल्ट विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होते. ट्रेनच्या संचालनाकरिता विद्युत प्रवाह सुरू असतो व पतंगीचा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकला. तर यातून प्रवाहित होणारा करंट पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यत पोहोचू शकतो. यातून दुर्घटना घडू शकते, याचबरोबर मेट्रो सेवाही प्रभावित होऊ शकते असा इशारा महामेट्रोने दिला.

याचबरोबर शहरात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडवितांना किंवा पतंग कटून आल्यानंतर ती विजेच्या तारांमध्ये किंवा खांबांवर अडकते. अडकलेली पतंग आणि मांजा काढण्यासाठी लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो.

CM Devendra Fadnavis : मेयो-मेडिकलमधील कामांच्या देखरेखीसाठी वॉर रूम !

मनपाकडून दिली जात आहे शपथ
‘पतंग उडविण्याचा आणि दुसऱ्याची पतंग काटण्याचा आनंद मोठा असला तरी… यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाने अनेकांचे बळी घेतले. मुख्या प्राण्यांसह पक्षीही जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही आणि माझ्या परिसरामध्ये कुणालाही नायलॉन मांजाचा वापर करू देणार नाही’ अशी शपथ नागपूरकरांना दिली जात आहे.