सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा सल्ला; महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
Nagpur जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्त आवश्यक आहे. परिश्रमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. आज पदवी प्राप्त झाली आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करावा, असं आवाहन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केलं.
वर्धा रोडवरील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश संजीव खन्ना बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विधी विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, विधी विद्यापीठाचे कुलसचिव विवेक गव्हाणे उपस्थित होते.
Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : साहित्य व्यवहार लाळघोट्यांच्या हाती जाण्याचा धोका
विधी कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधी विद्यापीठातून कायद्याची अक्षर ओळख करून घेण्यासोबतच कायद्यामागची भूमिका, इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यामुळे विधी कारकीर्द हे महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते, असंही सरन्यायाधीश म्हणाले.
विधी विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकीर्दीचे विस्तीर्ण असे क्षेत्र खुले आहे. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता विविध शाखा उपलब्ध झाल्या आहेत. ज्ञानार्जनासाठी अनेक संधी आज उपलब्ध झाल्या आहेत, असं विधी विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आणि उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
Supriya Sule : सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला !
आदिती बैसला सर्वाधिक सात सुवर्णपदके
पदवीप्रदान समारंभात एकूण १५५ पदवी प्रदान करण्यात आल्या . ज्यामध्ये ११२ पदवी, २८ पदव्युत्तर आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या. सर्वाधिक सात सुवर्णपदके विद्यार्थिनी अदिती बैस यांना मिळाली. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक विद्यार्थी विश्वजीत राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.