Breaking

CM Devendra Fadnavis : सावित्रीबाई फुले स्मारकावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान !

सातारा

Complete the memorial work by the bicentenary of Savitribai Phule : द्विशताब्दीपर्यंत काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Satara क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी 10 एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे सावित्रीमाई जयंती उत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ‘महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालायचे आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम करायचे आहे. त्यादृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवंत स्मारक सक्षम महिलेचे प्रतिक होय. त्यांचा विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून स्वयंपूर्ण महिला घडविण्याचे कार्य शासन करेल,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

MLA Randhir Sawarkar : रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर!

महिलाराज येईल
महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याने पुढील काळात निश्चितपणे महिलाराज येईल. केंद्र शासनाच्या लखपतीदीदींसारख्या योजनेच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत 50 लाख महिलांना लखपती दीदी घडविण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विषमता दूर करण्याचे काम

फडणवीस म्हणाले, ‘ब्रिटीशांच्या काळात स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत होती. त्या काळात समाजातील विषमता दूर करून समतेचे बीजारोपण करण्याचे कार्य फुले दांपत्याने केले. शिव्या-श्राप, शेण गोळे खावे लागले तरी सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता स्त्रियांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवली. या कार्यात महात्मा फुले हे हिमालयाप्रमाणे त्यांच्या सोबत होते. त्यांनी विधवांच्या केशवपन, बालहत्या यासारख्या बाबींना कृतिशील विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.’

विचारांचेही स्मारक व्हावे
समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. याची कबुली स्वतः महात्मा फुले यांनी अनेकदा दिलेली आहे. थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही. त्यांचे स्मारक उभे करत असताना पुतळ्यासोबतच विचारांचेही स्मारक झाले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.