Breaking

Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!

Fraud of four and a half crores in the name of Cryptocurrency : दुप्पट परताव्याचे आमिष, पैसे घेऊन आरोपी फरार

Akola खदान पोलिस ठाणे हद्दीतील विद्युत कॉलनी, रिंग रोड येथे ‘अॅडव्हाइस अलायन्स’ Advance Alliance या कंपनीच्या कार्यालयात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात माजी सैनिकाच्या पत्नीसह अनेकांना दुप्पट परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. आणि तब्बल ४ कोटी ४६ लाख रुपयांनी गंडवण्यात आले.

फसवणूक झालेल्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. सुरेखा गौतम ओवे (३८, रा. गोकुळ कॉलनी, पोदार शाळेजवळ, अकोला) यांनी खदान पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नागेश अरुण वाहुरवाघ (५२) आणि सोनाली नागेश वाहुरवाघ (५५) – दोघेही राहणार खडकी, धाबेकर नगर, गौरव प्रभाकर अंबुसकर (२७) – अॅडव्हाइस अलायन्स कंपनीचा सीईओ, रा. पिल कॉलनी, निवारा कॉलनी-२, मलकापूर, उमेशकुमार निखाडे (४५) – राहणार सागर कॉलनी, बायपास यांनी दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.

Amravati Congress : काँग्रेस पोहोचली थेट आयुक्तांच्या कक्षात!

या प्रकरणातील मुख्य आरोपी नागेश आणि सोनाली वाहुरवाघ हे तक्रारदार महिलेचे नातेवाईक आहेत, तर उमेशकुमार निखाडे हा तक्रारदार महिलेच्या पतीचा मित्र आहे. म्हणजेच, नातेवाईक आणि मित्रानेच विश्वासघात करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याने तक्रारदार ओवे आणि अन्य गुंतवणूकदार स्तब्ध झाले आहेत. आरोपी वाहुरवाघ दाम्पत्याने तक्रारदार महिलेला कंपनीच्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारात गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी असेही सांगितले की, कंपनी क्रिप्टोकरन्सी खरेदी-विक्री तसेच इतर व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे.

या भूलथापांना बळी पडून तक्रारदार ओवे यांनी सुमारे ४४ लाख रुपये अॅडव्हाइस अलायन्स कंपनीत गुंतवले. मात्र, परताव्याच्या नावाखाली फक्त आश्वासनं मिळाली आणि शेवटी संपूर्ण फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेसह अनेकांना मोठ्या परताव्याचे स्वप्न दाखवून तब्बल ४ कोटी ४६ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरटीजीएसद्वारे १ लाख, ३ लाख, ५ लाख अशा टप्प्याटप्प्याने रक्कम हस्तांतरित केली. तर १० लाख रुपये रोख रक्कम लुबाडली. फोन-पेद्वारे ९९,९९९ रुपये उकळले. तसेच बॉण्ड करारनाम्यावर पैसे गुंतवले असल्याचा बनाव केला.

Dr. Pankaj Bhoyar : पालकमंत्र्यांचा कानमंत्र, आयुष्याचा निर्णय योग्यवेळी निर्णय घ्या!

फसवणूक झालेल्या १५-२० नागरिकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. अजूनही काही जण पुढे येण्याची शक्यता आहे. खदान पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.