Breaking

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्री पोहोचले परीक्षा केंद्रावर

The Minister of State Pankaj Bhoyar reached the examination center : पंकज भोयर यांची शेगांव येथील केंद्राला भेट

Khamgao इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. राज्यभर कॉपी मुक्त अभियान राबविले जात आहे. अशात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष् महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला त्यांनी भेट दिली. परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी काॅपीमुक्त अभियानाचा आढावाही घेतला.
या भेटीच्या वेळी भारतीय संस्कृतीप्रमाणे प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले व पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार केले.

यावेळी आशिष वाघ उपशिक्षणाधिकारी (मा), अनिल देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्रा),गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे, योगीराज फाउंडेशनचे सचिव डॉ. श्यामकुमार बुरूंगले, श्रीधर पाटील उपस्थित होते. आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा राबविली जात आहे का याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही भेट दिली. या पाहणी दरम्यान त्यांनी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती दिली.

Love marriage : प्रेमच नव्हे, लग्नही करा बिनधास्त !

याशिवाय विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांनी कॉपीमुक्त अभियात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ११ फेब्रुवारी राेजी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच महाप्रसादही घेतला.

CM Devendra Fadnavis : महापालिकेत तीन दिवसांत तीनशेहून अधिक तक्रारी!

जिल्ह्यात ११६ केंद्रावर बारावीची परीक्षा
जिल्ह्यात ११६ केंद्रावर इयत्ता बारावीच्या परीक्षेस ११ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. जिल्हाभरातील ३४ हजार ६३५ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने चाेख नियाेजन केले आहे.