Thoughts expressed by the former Vice-Chancellor of Sanskrit University :
डॉ. पंकज चांदे यांची खंत; ‘घानमाकड’ पुस्तकाचे प्रकाशन
Nagpur ‘पूर्वी ग्रामीण भागात जातींचा उल्लेख सहजतेने व्हायचा. त्यात कुणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यांमध्ये सहजता आणि नैसर्गिकता होती. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या नात्यांत विष पेरण्याचे काम राजकारणाने केले’, अशी खंत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.
Maharashtra Times चे सहायक संपादक अविनाश महालक्ष्मे Avinash Mahalaxme लिखित ‘घानमाकड’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. चांदे यांच्या हस्ते रविवारी (दि. ५ जानेवारी) झाले. त्यावेळी ते बोलत होते. BRA Mundle बीआरए मुंडले स्कूलच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी साहित्य अकादमीचे Sahitya Academy सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, शिरपूर गावचे सरपंच गणेश डाहुले उपस्थित होते.
‘घानमाकड ही प्रत्येक गावात नसते. घाण्याचा बैल गोलगोल फिरतो त्यासारखे हे लाकूड फिरते. मेरी गो राउंडपेक्षाही merry go round प्राचीन असा हा खेळ आहे. हा खेळ खेळताना माकडासारखे बिलगून राहावे लागते. त्यामुळे या खेळासाठी ‘घानमाकड’ अशा शब्द रूढ झाला. तेव्हाच्या ग्रामीण जीवनात सलोखा होता. आपुलकीचं नातं होतं. याचेच प्रतिबिंब या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. प्रासादिकता, सूक्ष्म निरीक्षण आणि प्रामाणिक शब्दातून ग्रामीण जीवनातील अस्सल वास्तव त्यात आहे,’ असंही डॉ. चांदे म्हणाले.
‘महानगरीय संस्कृतीमुळे आज गावांच्या आठवणी धूसर होत चालल्या आहेत. अशात विस्मृतीत जाऊ बघणाऱ्या गावपणाला भानावर आणण्याचे काम ‘घानमाकड’ करेल’, असा विश्वास श्रीपाद अपराजित Shripad Aparajit यांनी व्यक्त केला. गावातील मातीशी असलेले ऋण फेडणे हा या पुस्तकामागील उद्देश असल्याचे अविनाश महालक्ष्मे म्हणाले.
लिखाणात हवी सहजता
‘सहजता ही आपल्या जीवनात राहिलेली नाही. सहजता असेल तरच ती लेखनात उतरते. लिखानाची निरागसता आपण हिरावून बसलो आहे. त्यातही सोपे लिहिणे अतिशय कठीण काम आहे. माणसांमध्ये रूची असणारी व्यक्तीच दर्जेदार लिखाण करू शकते. या पुस्तकातून वास्तवातील लालित्य मांडण्यात आले आहे. प्रश्न निर्माण करणाऱ्या लिखाणात नावीन्यता असते, असे डॉ. प्रमोद मुनघाटे Pramod Munghate म्हणाले.