Breaking

Experiments by farmers on raw turmeric : वायगावच्या नामांकित हळदीला प्रक्रिया उद्योगांची प्रतीक्षा

  • Waigaon turmeric awaiting processing industries : कच्च्या हळदीवर शेतकऱ्यांकडून प्रयोग

Wardha समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळदे) येथे उत्पादित होणारी औषधीयुक्त हळकुंडाची मागणी वाढते आहे. यंदा २०० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे. सध्या बाजारात या हळदीला २८ ते ३० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. मात्र, वायगाव परिसरात उत्पादित होणाऱ्या हळदीवर आधारित उद्योग नाहीत. त्यामुळे नामांकित हळद असूनही याचा अपेक्षित फायदा येथील नागरिकांना होताना दिसून येत नाही.

देशात उत्पादित होणाऱ्या हळदीच्या तुलनेत समुद्रपूर तालुक्यात उत्पादित होणाऱ्या हळदीत औषधीयुक्त गुणधर्म कुरकुमीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळेच बाजारात वायगाव हळदीची मागणी वाढली आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हळदीला मोठा वाव आहे. औषधी गुणधर्म ओळखून प्रशासनाच्यावतीने जीओ टॅग मिळवून दिले होते. असे असताना आतापर्यंत कोणताही प्रक्रिया उद्योग येथे स्थापन झाला नाही.

HMPV : विषाणूला घाबरू नका !

तालुक्यात होते परंपरागत शेती
वायगाव हळदीला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. मुघल काळापासून तालुक्यात हळदीची शेती केली जाते आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत असल्याने येथील शेतकरी पारंपरिक शेतीपिकांसह हळदीचे उत्पादन प्रामुख्याने घेतात. तर अनेक युवा शेतकऱ्यांनी हळदीची मागणी ओळखून त्यावर आधारित उत्पादने तयार करीत आहेत. मात्र, याचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग होत नसल्याने तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.

कच्च्या हळदीवर प्रयोग
वायगाव येथे उत्पादित होणाऱ्या हळदीचे आरोग्य आणि फार्मा सेक्टरमध्ये बहुउपयोगी आहे. यात आढळून येणारा कुरकुमीनचा उपयोग होमिओपॅथिक औषधी निर्मितीत होतो. येथील दोन प्रकारची हळद प्रचलित आहे. सलेम आणि वायगाव हळद, जिथे सलेम हळदीत कुरकुमीनची मात्रा २.३ टक्के एवढी आहे. तेच वायगाव हळदीत ४.५ टक्के एवढी आहे. त्यामुळे या हळदीला ठोकमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दर बाजारात मिळतो आहे. काही शेतकरी व शेतकरी गटांकडून लघु प्रक्रिया उद्योग उभारले आहे. मात्र, पॅकेजिंगसह ब्रॅण्डिंगचे तंत्र माहिती नसल्याने तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.

पोस्टाने घेतली होती दखल
वायगाव हळदीला वायगाव येथील जीओ टॅग मिळाले आहे. पण देशात ओळख देण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या वतीने सन २०२२ मध्ये पोस्ट लिफाफा तयार केला होता. त्यावर वायगाव हळदीची माहिती प्रकाशित केली होती. पोस्टाच्या वतीने प्रसार केल्यानंतर येथे मोठा प्रक्रिया उद्योग स्थापन होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, अद्याप समुद्रपूर तालुका अथवा आसपासच्या परिसरात उद्योग स्थापन झाला नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.