Ravikant Tupkar warned BJP leader MLA Babanrao Lonikar : ताबडतोब माफी मागा, नाहीतर शेतकरी जोड्याने हाणतील
Nagpur : शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना राज्याचे माजी मंत्री, भाजप नेते आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. ‘तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, बूट.. सर्व आमच्यामुळे आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकरांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस नेत्यांनी लोणीकरांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोणीकरांना सुनावले आहे.
यासंदर्भात रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांचे कपडे, मोबाईल, बूट, घड्याळ जे काही आहे, ते फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे. नाहीतर तुमच्याकडे काहीच नसतं, असं वक्तव्य करून भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !
वास्तविक पाहता तुमच्या अंगावरचे कपडे, तुमचा मोबाईल, तुमच्या ताटातलं जेवण आम्हा शेतकऱ्यांमुळे आहे. ताबडतोब शेतकऱ्यांची माफी मागी, नाहीतर शेतकरी तुम्हाला जोड्यानं हाणतील. तुम्ही ज्या सभागृहात गेले, ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेले आहात. तुमचा परिवार जे अन्न खातात, ते आम्हा शेतकऱ्यांच्या घामातून आलेलं आहे. तुम्ही काय उपकाराची भाषा करता? आम्ही शेतकरी भिकारी नाहीत, तर आम्ही देशाला पोसणारे लोक आहोत, हे लक्षात ठेवा, असं तुपकर म्हणाले.
Akash Fundkar : बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना बसणार दणका
शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार बबनराव लोणीकरांना नाही. सत्तेचा माज आणि पैशांची मस्ती त्यांना आलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन लोणीकरांच्या वक्तव्यातून होतं आहे. शेतकऱ्यांची माफी बबनरावांनी मागितली पाहिजे. इथून पुढं जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर लक्षात ठेवा तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे, अशा शब्दांत तुपकरांनी त्यांना बजावले आहे. महाराष्ट्रात तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगड्यातला शेतकरी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, बबनराव जिथं कुठं दिसल, तिथंच त्याला जोड्यानं हाणा. त्यामुळे सत्तेतील कुण्याही नेत्याची यापुढे अशी हिंमत होणार नाही, असेही ते म्हणाले.