Breaking

Gajendra Singh Shekhawat : पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करेल ‘ओटीएम 2025’

‘OTM 2025’ will enhance mutual business relations in the tourism sector : केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला दिली भेट

Mumbai : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे मे. फेअर फेस्ट मीडीया लि. यांच्यावतीने आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो असणारा ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२५’चे (ओटीएम २०२५) आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या ट्रेड शो मधील महाराष्ट्र दालनाला भेट दिली.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांनी यावेळी गजेंद्रसिंह शेखावत यांचे स्वागत केले. महाराष्ट्रातील 70 हून अधिक भागधारकांनी महाराष्ट्र दालनात सहभाग घेतला. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पांदण रस्त्यांचा नागपूर पॅटर्न

यावर्षी हे प्रदर्शन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहितीदेखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत 70 हून अधिक भागधारक यामध्ये सहभागी होते.

या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा याची माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Chandrakant Patil : ..तर कला शिक्षण व्यावसायिक दृष्ट्या अधिक उपयुक्त ठरू शकेल !

ओटीएम प्रदर्शनात दरवर्षी ६० देशांतील २,१०० प्रदर्शक, ३० राज्य आणि ४० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात. या ट्रॅव्हल ट्रेड शोमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने आहेत. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.