Breaking

Guillain Barre Syndrome : जिल्ह्यात GBS चे ४ संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

Four GBS suspected cases reported in maharashtra : जिल्ह्यात ३० जानेवारीपर्यंत चार संशयित रुग्ण आढळले

Akola जिल्ह्यात ३० जानेवारीपर्यंत गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांना उपचारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथून सुटी देण्यात आली आहे. तर उर्वरित दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एक रुग्ण मूळ अकोल्याचा तर दुसरा अकोटचा रहिवासी आहे. एकाचं वय २२ वर्षे असून दुसऱ्याचं ५५ वर्षे आहे.

हे दोन्ही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे उपचार घेत आहेत. ही माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. GBS आजाराने नागरिकांनी घाबरू नये, पण सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यात पुणे महानगरपालिका व काही शेजारील जिल्ह्यांमध्ये GBS रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराच्या प्रभावी हाताळणीसाठी मानक कार्यप्रणाली (SOP) कडकपणे लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

Vanchit Bahujan Aghadi : अमृतसरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

या आजाराबाबत घाबरण्याची गरज नाही, पण पुरेशी दक्षता घ्या. लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून योग्य उपचार घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी GBS संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा आणि माहिती द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये प्रतिबंधात्मक आणि सर्वेक्षणात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिल्या आहेत.

MLA Sudhakar Adbale : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा तापणार?

GBS म्हणजे काय?
गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ ऑटोइम्युन न्यूरोलॉजिकल विकार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि हालचालींवर परिणाम होतो. या आजाराचे निश्चित कारण माहीत नाही, मात्र गेल्या चार ते सहा आठवड्यात झालेल्या संसर्गामुळे तो उद्भवू शकतो.

GBS ची लक्षणे
हात-पायात अशक्तपणा किंवा मुंग्या येणे, शरीराच्या वरच्या भागात अशक्तपणा जाणवणे, चालण्यात, डोळे-चेहरा हलवण्यात अडचण, वेदना, मूत्राशय व आतड्यांच्या हालचालींवर परिणाम, वेगवान हृदयगती, रक्तदाबातील चढ-उतार, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास अडचण, अंधुक दृष्टी अशी काही याची लक्षणं आहेत.

A case of suicide due to online games : तरुणीने जर्मन भाषेत लिहिली ‘सुसाईड नोट’ !

कोणती काळजी घ्यावी?
शुद्ध पाणी प्या – पाणी उकळून प्यावे व दूषित पाण्याचा वापर टाळावा.
स्वच्छता राखा – वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखावी.
शिजवलेले व न शिजवलेले अन्न वेगळे ठेवा – खराब किंवा न शिजवलेले अन्न खाऊ नये.
GBS ची लक्षणे जाणवली तर विलंब न लावता आरोग्य तपासणी करून घ्या.