The work of Jaljeevan Mission was disrupted, government not providing funds : जलजीवन मिशनची कामे खोळंबली, शासनाने निधीच दिला नाही
Wardha शासनाने ‘हर घर नल से जल’ देण्याचा गाजावाजा करीत जलजीवन मिशन योजना सुरू केली होती. या योजनेची कामेही कंत्राटदारांना पूर्ण किमतीमध्ये देण्यात आली. कंत्राटदारांनीही कमाईवर डोळा ठेवून पेटी कंत्राटदारातून कामाला गती देण्यात आली. परिणामी निकृष्ट कामांचाही सातत्याने आराेप होत आला आहे.
आता यासोबतच निधीचाही दुष्काळ जाणवत असल्याने कंत्राटदारांच्या कामांची गती संथ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिकांच्या डोक्यावर हंडाच येणार असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही भटकंती थांबावी आणि प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, याकरिता तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली.
Amit Shah, Devendra Fadnavis : आता कारागृहातच उभे होणार न्यायालयाचे Witness Box!
तब्बल ३५० कोटींच्या निधीतून ८३९ योजना हाती घेण्यात आल्या होत्या. पण, अद्याप ४४१ योजनाच पूर्णत्वास गेल्या असून, इतर कामे प्रगतिपथावर आहे. पण, आता निधीअभावी ही कामे ठप्प पडल्यागत असून, सध्या ‘अधिकारी म्हणतात काम अन् कंत्राटदार मागतात दाम’ अशी अवस्था झाली असून, यात नागरिकांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार हे नक्कीच आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाकरिता शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. गेल्या आठ महिन्यांपासून निधी उपलब्ध झाला नसल्याने कंत्राटदारही आता कामे करण्यास तयार नाही. जवळपास ३५ कोटींचे देयक थकल्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली असून, कंत्राटदार कामे करण्यासाठी तयार नाही. अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कामे करण्यास दबाव टाकला जात असल्याने आता कंत्राटदारही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.
PM Kisan, Namo Kisan scheme : सरकारी योजनांतून शेतकऱ्यांना वर्षभरात २३२ कोटी
नळ जोडणीचे काम पूर्ण झाले असून, त्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ जोडणीचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ९४२ नळ जोडण्या करायच्या असून, आतापर्यंत २ लाख ३४ हजार ७७५ नळजोडण्या पूर्व झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नळजोडणीचे काम सुरू असून, नागरिकांना आता शुद्ध व मुबलक पाण्याची प्रतीक्षा आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाकरिता शासनाकडून अद्याप निधी आलेला नाही. सप्टेंबर महिन्यापासून निधी मिळाला नसल्याने याचा परिणाम कामांवर झाला आहे. कंत्राटदारांना देयक मिळाले नसल्याने त्यांनीही कामाची गती कमी केली आहे. शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी प्राप्त होताच कंत्राटदारांचे देयक अदा केले जाणार आहे.
Anandrao Adsul : हा कसला सामाजिक न्याय? योजनाच पोहोचल्या नाहीत!
जलजीवन मिशन योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. त्याकरिता या योजनेतून सुरुवातील जलवाहिनी टाकण्यात आली असून, घरापर्यंत नळजोडणी केली आहे. नळ जोडणीचे काम ९८.२५ टक्के झाले असले तरीही काही भागात घरात नळच पोहोचले नसल्याचेही वास्तव आहे.