Breaking

Harshwardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

 

Ex MLA arrested by Nagpur police : उद्धव ठाकरे यांच्या सहायकाला केली होती शिवीगाळ; नागपुरात कारवाई

Nagpur भाजपचे जेष्ठे नेते रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी नागपुरातून अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांना अटक करुन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले.

छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये विमानतळावर उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयीन सहायकाला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यावेळी त्या मंत्रालयीन सहायकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलिसांनी जाधव यांच्यावर शिविगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Minister Dada Bhuse : शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्याचा इफेक्ट! डेस्क-बेंचसाठी अडीच कोटींचा प्रस्ताव

२०१४ मध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला सुरु असताना न्यायधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, जाधव न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वारंवार समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मूभा दिली. मात्र, जाधव हे न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र नोटिस (एनबीडब्ल्यू) पाठविण्यात आला होता. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे सोमवारी दुपारी हर्षवर्धन जाधव आपल्या वकिलांसह न्यायालयात उपस्थित झाले.

Zilla Parishad Gondia : विषय समिती खाते वाटप २४ फेब्रुवारीला!

दुपारी न्यायालयीन कामकाज सुरु झाले. न्यायालयात जाधव उपस्थित होते. न्यायालयाने त्यांना वारंवार अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, न्यायालयाने जाधव यांना उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही त्यांनी वारंवार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने जाधव यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तसेच जाधव यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेशही दिले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, जाधव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. उपचारानंतर जाधव यांनी रितसर अटक करण्यात येणार असून मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.