600 students did not get the annual fund : वर्ष संपत आले तरीही निधी मिळाला नाही
Wardha महाराष्ट्र शासनाने ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींची प्रत्येकी १०० क्षमतेची दोन वसतिगृहे मंजूर केली. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एका विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षासाठी ६० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पण आता वर्ष संपत आले तरीही ओबीसी विभागाने निधीच दिला नसल्याने जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांचा आधारच हिरावल्याचे चित्र आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा मुला-मुलींसाठी बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्येकी वर्षाकाठी ६० हजार रुपये देण्यात येणार आहेत. या ज्ञानज्योती आधार योजनेचे तब्बल दोन वर्षांनंतर शासनाच्या जिल्हास्तरीय ओबीसी सहायक संचालकांनी अर्ज घेऊन त्याची निवडही केली.
Collector of Nagpur to investors : तुम्ही तयारी करा, आठ दिवसांत मंजुरी देतो!
परंतु, वर्ष संपत आले असताना या विद्यार्थ्यांना अजूनही या आधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत. या योजनेच्या भरवशावर ज्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांनी शहरात शिक्षणासाठी राहून भाड्याने खोली घेऊन शिक्षण सुरू केले त्यांना या योजनेत पात्र होऊनही अजून आधार योजनेतून घरभाडे व भोजन भत्त्यापोटी वर्षभराचे ६० हजार रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची व शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे.
Sunil Kedar : केदारांच्या निकवर्तीयांचा दावा, लाडकी बहीण योजना अवैधच !
यासाठी वर्धा जिल्ह्यात ६०० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटींची आवश्यकता आहे. तो निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विशाल हजारे, नीळकंठ राऊत, अमोल ठाकरे, कविता मुंगळे, किरण कडू, अमृतराव शेंडे, नरेंद्र चर्जन, अविनाश गमे, प्रवीण मख, भरत चौधरी, केशव तितरे, डाॅ. अविनाश गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.