Breaking

Illegal liquor sale : अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिलांचा एल्गार!

 

Women’s protest at Police station : पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा; अमरण उपोषणाचा इशारा

Buldhana सिंदखेड राजा तालुक्यातील वडाळी गावात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी २ मे राेजी पोलिस ठाण्यावर धडक देत ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले. या आंदोलनात महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावातील पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महिलांनी निवेदनात स्पष्ट केले की, गावात खुलेआम अवैध देशी व विदेशी दारू विक्री केली जात असून, संबंधित विक्रेत्यांनी वारंवार विनंती करूनही व्यवसाय बंद केलेला नाही. उलट, “आम्ही पोलिसांना हप्ते देतो, आम्हाला कोणी हात लावू शकत नाही,” अशा धमक्या दिल्या जात असल्याने गावात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

Dilip Sananda : माजी आमदाराची या मागणीसाठी रक्ताने स्वाक्षरी!

वडाळीमध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याने या दारूबंदीच्या मागणीला अधिक गंभीरता आहे. शाळेच्या परिसरात नशेत धुडगूस घालणारे लोक जातिवाचक शिवीगाळ, असभ्य वर्तन करतात. याचा थेट परिणाम शाळकरी मुलांवर आणि अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे महिलांनी सांगितले.

Mehkar Municipal Council : अतिक्रमण कारवाई सुरू असताना रेकॉर्ड रुमला आग!

या गंभीर पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने एकमताने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, सात दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास महिलांनी अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच कृषी वार्ता काकडे, तसेच रामभाऊ काकडे, सूर्यकांत काकडे, राजू साबळे, रमेश मुंडे, चंद्रकांत काकडे, आणि गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. निवेदनावर शेकडो गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.