Possibility of change in tax-free limit up to Rs 12 lakh : 12 लाखांपर्यंत करमुक्त मर्यादेत बदलाची शक्यता
New Delhi : देशातील करप्रणालीत मोठा बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवं इनकम टॅक्स विधेयक लोकसभेत मांडणार आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्री निर्मला सीतारमण सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी हे विधेयक लोकसभेत सादर करतील. नव्या विधेयकात करसवलतीच्या मर्यादेत बदल होण्याची शक्यता असून, 12 लाखांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्न मर्यादेत फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
रिजिजू म्हणाले की, हे विधेयक संसदीय निवड समितीच्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आले असून, सरकारने त्या मान्य केल्या आहेत. मागील आयकर विधेयक मागे घेऊन नवं विधेयक मांडण्याचा निर्णय मोठ्या प्रमाणावर दुरुस्त्या आवश्यक असल्याने घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “हे एक सामान्य संसदीय पद्धतीचं उदाहरण आहे. जेव्हा एखाद्या विधेयकात खूप मोठ्या प्रमाणावर बदल करायचे असतात, तेव्हा असं पाऊल उचललं जातं,” असं ते म्हणाले.
Sharad Pawar : शरद पवारांचं एकनाथ शिंदेच्या दिल्ली भेटीवर गूढ वक्तव्य
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या संसदीय निवड समितीने या विधेयकात तब्बल 285 बदल सुचवले होते. सरकारने हे सर्व बदल स्वीकारले असून, नव्या विधेयकात त्यांचा समावेश असेल. रिजिजू यांनी सांगितलं की, प्रत्येक दुरुस्ती वेगवेगळी मंजूर करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने एकत्रितपणे सर्व मान्य बदलांसह नवं विधेयक मांडण्यात येणार आहे.