Breaking

International Diabetes Conference : मुख्यमंत्री बनले डॉक्टर, दिल्या मधुमेह टाळण्याच्या टीप्स !

Chief Minister Devendra Fadnavis became a doctor : नागपुरात मधुमेहासंदर्भात बारावी आंतरराष्ट्रीय परिषद

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. आता नागपूरमध्ये ते प्रत्यक्ष ‘डॉक्टर’च्या भूमिकेत दिसले. डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हॅलो डायबिटीज’ या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मधुमेह टाळण्यासाठी उपयुक्त जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

देवेंद्र फडणवीस हे डायटच्या बाबतीत अतिशय वक्तशीर मानले जातात. त्यांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय परिषदेत मधुमेह टाळण्याच्या टीप्स दिलाय. पारंपरिक जीवनशैलीतून विकसीत झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परीणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

Sahitya Sammelan : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला

भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर व चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून आरोग्य विषयक जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे.

मधुमेह या आजारावर अधिक सखोल संशोधन होणे ही काळाची गरज आहे. या परिषदेच्या माध्यमातून मधुमेह जडण्याची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या शारीरिक क्षमता क्षीण करणाऱ्या या आजारावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचार आहे. गरोदर स्त्रियांना व त्यातून पुढे नवजात बालकांना होणारा मधुमेह रोखण्याचे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे.

Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच

या परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्यास येणारी पिढी निश्चितच मधुमेहमुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. डायबिटीस हा आजार झालेला असतानाही तो न स्वीकारण्याची मानसिकता असणे ही आपल्या येथील सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी या आजाराची भीती न बाळगता औषधोपचार करण्यासोबतच जीवनशैलीत सुधार आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन या परिषदांमधून होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.