Breaking

Ladki Bahin Yojna : फक्त सहा लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ

Only the six Ladki Bahin refused the benefit : बालविकास अधिकाऱ्याकडे सादर केला अर्ज

Wardha जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे अनेक महिला निकषात न बसल्याने त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत केवळ सहा महिलांनी स्वतः पुढाकार घेत महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे योजनेचा लाभ नाकारला. यासंदर्भातील अर्ज देखील सादर केला आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात लवकरच पात्र ठरलेल्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा आहे. अनेक महिला पात्र नसतानाही त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा होत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे या अर्जाची संबंधित विभागामार्फत पडताळणी केली जाणार असल्याची सांगण्यात येत आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर आहे, घरात कोणी नोकरदार आहे, आयकर भरणारे कुटुंब, चारचाकी वाहन असणे अशा महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतात.

Scholarship Conference : चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी शिष्यवृत्ती

याशिवाय दीड हजार व त्यापेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेत असलेली महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरते. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात अनेक महिलांनी दोन्ही योजनांचा एकत्र लाभ घेतल्याचेही प्रकार समोर येत आहे.
याशिवाय काहींनी योजनेचे निकष, तसेच नियम व अटी माहिती नसल्याने चुकीने लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टलद्वारे भरले होते. अशा अर्जांची आता छाननी होऊन ते अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या आवाहनानंतर सहा लाडक्या बहिणींनी स्वतःहून पुढाकार घेत महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे आम्हाला या योजनेच्या लाभाची आवश्यकता नसल्याचा अर्ज दाखल केला आहे. यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये लाभ नाकारणाऱ्यांची संख्या वाढू शकते.

Mahayuti Government : ३५ महाविद्यालयांमध्ये ‘चाणक्य’ केंद्र!

जिल्ह्यामध्ये ३ लाख १३ हजार ४६२ महिलांपैकी केवळ सहा महिलांनीच आतापर्यंत स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. अशा महिला लाभासाठी अपात्र ठरणार आहेत. याशिवाय आयकर भरणारे कुटुंब, सरकारी नोकरदार कुटुंबातील सदस्य, पेन्शनर्स, चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील सदस्य याशिवाय सरकारच्या कोणत्याही आर्थिक योजनेअंतर्गत दीड हजार रुपये व त्यापेक्षा अधिक लाभ मिळवणारे हे या योजनेसाठी अपात्र ठरतील.

वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ३ लाख २० हजार ४४५ महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ लाख १३ हजार ४६२ महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तर ४ हजार ८७७ महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर केवळ ६ महिलांनी स्वत:हून या योजनेचा लाभ नाकारला आहे.

DCM Ajit Pawar Akash Fundkar : पायाभूत आणि आरोग्य सुविधांवर भर

ज्या महिलांनी नजरचुकीने पात्र नसतानाही अर्ज भरले, तसेच अर्ज भरल्यानंतर शासकीय नोकरी लागल्यास किंवा आयकर भरत असल्यास अशा महिला लाभास अपात्र ठरतात. त्यामुळे या लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे योजनेचा लाभ नाकारत असल्याचा लेखी अर्ज करावा.