Breaking

Maharashtra Congress : नव्या कार्यकारिणीत 40 टक्के ओबीसी नेत्यांचा समावेश !

Congress’ new strategy for OBCs : ओबीसींना भुरळ पाडण्याची काँग्रेसची नवी रणनिती

Mumbai : राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करत ओबीसी समाजाकडे स्पष्टपणे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. नव्या कार्यकारिणीत तब्बल 40 टक्के जागा ओबीसी नेत्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीमध्ये एकूण 280 सदस्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये ओबीसी समाजाचे 112 प्रतिनिधी असतील. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही यादी दिल्लीत पाठवली असून लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. या नव्या कार्यकारिणीत प्रवर्ग निहाय आरक्षणाचे चित्र पुढीलप्रमाणे स्पष्ट झाले आहे. ओबीसी: 40 % अनुसूचित जाती व जमाती: 16 ते 17 % अल्पसंख्याक: 18 ते 19% खुला वर्ग: 25 ते 28% महिला आरक्षण विशेष राखीव 15%

Kokate Rummy Game : कृषीखाते अजित दादांनीच संभाळावे

 

काँग्रेसच्या या निर्णयामुळे विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. विशेषतः ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला बळ देण्यावर काँग्रेसचा स्पष्ट भर आहे. नव्या कार्यकारिणीत पदांची मांडणी पुढीलप्रमाणे असेल: जनरल सेक्रेटरी: 110 ते 115, सेक्रेटरी: 105 ते 108 वरिष्ठ उपाध्यक्ष: 15 ते 20 उपाध्यक्ष: 35 ते 40 वरिष्ठ प्रवक्ते: 5
मीडिया समन्वयक: 1 खजिनदार: 1

Tanushree Dutta : माझ्यावर सुशांतसिंगसारखं करायचा प्रयत्न

काँग्रेसच्या नव्या रणनीतीत विदर्भाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्यकारिणीतील सुमारे 40 टक्के सदस्य हे विदर्भातून असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विदर्भातील ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी हा मोठा डाव असल्याचे मानले जाते. राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा निर्णय भाजपासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. ओबीसी समाजावर पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने ही व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरेल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी सर्व पातळीवर तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

___