Breaking

Mahavitaran Washim : वीज बील भरतो, पण चिल्लर मोजा !

Man brought coins to pay the electricity bill : कर्मचाऱ्यांना पैसे मोजायला लागले पाच तास

Washim भारत हा अजब गजब लोकांचा देश आहे, असं आपण गमतीनं म्हणतो. पण हे वाक्य सिद्ध करणाऱ्या घटनाही भारतात घडत असतात. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात घडलेल्या एका घटनेची आता राज्यभर चर्चा होत आहे. इथे एका व्यक्तीने वीजेचे बील Electricity Bill भरायला चक्क चिल्लर पैसे आणले. चिल्लर पैसे आणून बिल भरण्याची ही पहिली वेळ नाही. पण त्याचे पैसे मोजायला पाच तास लागणे ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

रिसाेड शहरात एका ग्राहकाने वीज बील करण्यासाठी चिल्लर आणले. ही घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल सात हजार रुपयांची नाणी घेवून हा ग्राहक आल्याने वीज कर्मचाऱ्यांना ते माेजण्यासाठी पाच तासांचा अवधी लागला. सात हजाराच्या बिलाची नोंद घ्यायला एकच मिनीट लागला. पण पैसे मोजायला पाच तास लागलेत. आज सगळ्या बिलांचा भरणा ऑनलाईन होत आहे. अशात चिल्लर पैसे आणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संबंधित व्यक्तीने परीक्षाच घेतली.

Ajit Pawar : अजित दादांनी ‘या’ विश्वासू शिलेदारावर दिली शिर्डीतील शिबीराची जबाबदारी !

ऑनलाईन व्यवहार हाेत असताना एका ग्राहकाने सुटे पैसे आणले. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. वीज वितरण कंपनीच्यावतीने सध्या थकीत देयके वसुलीसाठी माेहिम सुरू आहे. कर्मचाऱ्यांकडून घरोघरी, दुकाने, आस्थापने, औद्योगिक संस्था वांच्याकडून वीज बिल वसुली केली जात आहे. काेणी ऑनलाईन तर कोणी रोख रकमेच्या स्वरूपात आपला वीज बिल भरणा करत आहेत.

रिसाेड शहरातील एका व्यापारी वीज ग्राहकाने बील भरताना सात हजार रुपयांची नाणी दिली. या नाण्यांचे वजन ५० किलो होते. ही नाणी मोजण्याची जबाबदारी तीन कर्मचाऱ्यांवर होती. तिघांनाही चांगलाच घाम फुटला. नाणी चलनात असल्याने कर्मचारी ते नाकारू शकले नाहीत. दरम्यान या घटनेची वाशिम जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या महावितरणने विशेष माेहिम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गंत आता थकीत देयके असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे.

Hair loss disease : चर्चा, बैठकांमध्ये केस गळतीचा लागेना सोक्षमोक्ष !

महावितरणची थकबाकी वाढली
वाशिम जिल्ह्यात महावितरणची थकबाकी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता थकलेले काेट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष माेहिमच सुरू केली आहे. आता कर्मचारी घराेघरी जावून वसुली करीत आहेत. तसेच ग्राहकांसाठी अभय याेजनाही सुरू केली आहे. या याेजनेला आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.