Action orders from the Director of Education : घाटाखालील ८९ शाळा अडचणीत; शिक्षण संचालकांचे कारवाईचे आदेश
Buldhana : सुट्टीच्या दिवशीही खिचडी शिजवून शासनाला गंडा घालणाऱ्या जिल्ह्यातील ८९ शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांनी याबाबत जिल्हा परिषदेला आठ दिवसांत कारवाईचे आदेश दिले आहेत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय कामकाजाच्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे. तसेच आहाराची नोंद शासनाच्या एएमएस पोर्टलवर करणेही अनिवार्य आहे. या नोंदीच्या आधारे शाळांना इंधन, भाजीपाला आदींचे अनुदान मिळते. जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका व खासगी अनुदानित अशा २,००३ शाळांमधून सुमारे २.६५ लाख विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
Dilip sananda : सानंदा म्हणतात, “जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं”
मात्र मार्च व एप्रिल महिन्यात काही मुख्याध्यापकांनी सुट्टीच्या दिवशीदेखील खिचडी शिजविल्याचा बनाव केला. वास्तविक सुटीच्या दिवशी पोषण आहार देणे बंदी आहे. मात्र, पोर्टलवर चुकीच्या नोंदी करून शासनाला गफलत दाखवली गेली. त्यामुळे आता या ‘खादाड’ मुख्याध्यापकांवर शिस्तभंगात्मक कारवाई होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती असताना ती ८० ते ९० टक्के दाखवली गेली.
Kashmir terrorist attack : ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा, अन्यथा जिथे असाल तेथेच ठोकू !
यामागे पोषण आहाराच्या अनुदानाचा लाभ स्वतःच्या फायद्यासाठी घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित शाळांची पडताळणी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक मुख्याध्यापकांची धावपळ सुरू झाली आहे.