Breaking

MLA Randhir Sawarkar : निधी दिला, उपयोगात किती आला ?

How much development fund is used? : आमदार रणधीर सावरकर घेत आहेत आढावा

Akola नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांच्या मागणीनुसार आमदार निधी व राज्य शासनाकडून प्राप्त विशेष निधीतून अनेक कामे प्रस्तावित केली जातात. या निधीचा खरोखरच उपयोग होऊन नागरिकांना सोयी सुविधा मिळत आहेत की नाही, याचा आढावा अकोला पूर्वचे आमदार व भाजपचे महासचिव रणधीर सावरकर यांनी घेणे सुरू केले आहे.

जिल्ह्यातील अनेक कामांसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्या आमदार निधीसह वशेष निधीतून कामे प्रस्तावित केली आहेत. ही कामे प्रस्तावित केल्यानंतर त्यातून होणारी विकास कामे दर्जेदार असावी, यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी निधी दिल्यानंतर तो खरोखरच उपयोगात येतो आहे का, याची तपासणीही ते स्वतः करतात.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

गेल्या पाच वर्षांत दिलेल्या निधीचा किती उपयोग मतदारसंघात झाला आहे, याचा आढावा घेण्यासाठी ते अनेक विकास कामांना सध्या भेटी देत आहेत. जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या तीरावर पानेट येथे गुप्तेश्वर शिवलिंग मंदिर आहे. महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यामध्ये पाच जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून रणधीर सावरकर यांनी तीर्थस्थळ म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. त्यासाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

परिसरात सभागृह, तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता असावा, यासाठी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर करून घेतला. या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी गुरुवारी मंदिर परिसराला भेट दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता राजीव सुलतान, शुभम म्हैसणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता आपोतीकर, ठाकरे, यांच्यासह भाजप नेते विजय अग्रवाल, जयंत म्हसने, गिरीश जोशी, शंकरराव वाकोडे, राजेश नागमते, मनीष मोडक, विवेक भरणे, मधुकर पाटकर, दत्तू पाटील गावंडे, ज्ञानेश्वर मोडक, पवन वर्मा व परिसरातील सरपंच व नागरिक उपस्थित होते.

Sachin Pilot on Narendra Modi : भाजपचा देशात ‘टॅक्स टेररिझम’!

मंदिराला ज्योतिर्लिंगाचा मान
जुन्या काळी अनेक भाविक बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देशभरात जाऊ शकत नव्हते. त्यासाठी पूर्णा नदीतीरावर बारा ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना केली. पानेट या गावात सुप्रसिद्ध संत ब्रह्मचारी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झाले आहे. त्यामुळे या स्थळाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या भागात पवित्र विहीर असून, त्याला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.