Don’t act like owners, Voters are the owners : सत्कार सोहळ्यात आमदार साजीद खान यांचा इच्छुकांना सल्ला
Akola काही दिवसांत महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी. आपल्या वॉर्डात मालकाप्रमाणे वावरू नका. मतदार हे वॉर्डाचे खरे मालक आहेत. त्यांच्या समस्या सोडविणे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. मतदारांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा, असा सल्ला अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी इच्छुकांना दिला.
स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शहर व ग्रामीण काँग्रेसच्यावतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीतील यश हे माझे एकट्याचे नाही. सर्व मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे यश आहे. त्यांच्या मेहनतीच्या बळावर ही निवडणूक मी जिंकू शकलो आहे. या निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास विकासकामांद्वारे सार्थ ठरवणार आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.
Sudhir Mungantiwar : ‘क्लायमेट चेंज’ धोरणात राहणार चंद्रपूरचा सहभाग !
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी माझ्यावर मतदानस्वरुपी विश्वास दाखविला. त्याचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. पक्षाने मला नगरसेवक बनविले, मनपात सभापती, विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. आता विधानसभेत आमदार म्हणून जबाबदारी दिली आहे. आज मी या आमदार पदावर पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासामुळे पोहोचलो, या शब्दांत आमदार साजिद खान पठाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Sports authority of India : खेलो इंडिया प्रशिक्षकांना निम्मे मानधन !
यावेळी माजी आ. बबनराव चौधरी, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, डॉ. अभय पाटील, मदन भरगड, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, डॉ. सुभाष कोरपे, महेश गणगणे, निखिलेश दिवेकर, श्याम उमाळकर, डॉ. संजीवनी बिहाडे यांची भाषणे झाली. काँग्रेस नेते रमाकांत खेतान, महेंद्र गवई, मो.इरफान, आकाश कवड़े, तश्वर पटेल, दिलीप खत्री, अनूप खरारे, पराग कांबळे, रवि शिंदे, मब्बा पहेलवान, शेख नवेद, अविनाश देशमुख आदींची उपस्थिती होती.