NHAI official’s mismanagement : आमदार सुलभा खोडके यांच्याकडून महामार्गाची पाहणी
Amravati शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कामांमध्ये एनएचएआयचे अधिकारी विश्वास साळुंखे यांनी नियमबाह्य व बेजबाबदार कारभार करत नागरिकांसाठी अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. महसूल, वाहतूक व प्रदूषण नियंत्रण विभागांची दिशाभूल करत नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे.
आ. खोडके यांनी नागपूर मार्गावरील रहाटगाव रिंग रोड टी पॉइंट येथील महामार्गाची महसूल प्रशासन, पोलिस विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली.
महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर ते अमरावती मार्गावर वाहतुकीचा मोठा भार लक्षात घेता रहाटगाव रिंग रोड टी पॉइंटजवळ उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामात अनेक त्रुटी व नियमभंग आढळून आले. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती उपाययोजना न करण्यात आल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
खोदकामामुळे लालखडीकडे जाणाऱ्या वाहनांना यु-टर्न घ्यावा लागत असून, त्यासाठी कोणताही सूचनाफलक लावण्यात आलेला नाही. यासंदर्भात एनएचएआयचे विश्वास साळुंखे यांना २५ एप्रिल रोजी पोलिस आयुक्तालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, महसूल प्रशासनालाही चुकीची माहिती देत शासन नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. उड्डाणपूलाच्या कामात राखेचा वापर केल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असून, रस्त्यावर राखेचे ढीग साचल्याने ती वाऱ्याने उडून वाहने अनियंत्रित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Local Body Elections : दोन वर्षांपूर्वी केलेली आरक्षण सोडत रद्द होणार?
“या कारणामुळे जर कोणतीही जीवितहानी झाली, तर त्यास जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत आमदार सुलभा खोडके यांनी एनएचएआयच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.