Breaking

MP Amar Kale : मला संसदेत बोलू देत नाही, माईक बंद करतात

The voices of opposition MPs are being suppressed : शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांचे आरोप

Wardha गेल्या दहा वर्षांपासून राज्यासह देशभरातही फोडाफाेडीचे राजकारण होत आहे. विरोधी पक्षांना संपविण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठवला किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने लावून धरले. तर आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याचा अनुभव खासदार म्हणून संसदेत आला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जुलै महिन्यात पहिल्यांदा खासदार या नात्याने संसदेमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील कापूस व सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (बोरगाव) येथे ‘चाय पे चर्चा’चे आयोजन केले होते. तेव्हा उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव देऊ. तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू असे आश्वासन दिले होते.

Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस!

आता या आश्वसनाला ११ वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ आयोजित करून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? याचा खुलासा करण्याचे आवाहन मी केले होते. त्यावेळी माईक बंद करून मला शांत बसायला सांगण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

अलीकडेच मणीपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करीत असताना मनिपुरातील हिंसाचाराबाबत बोलायला लागलो. तर भाषण लवकर संपविण्याच्या सूचना सभापती महोदयांनी केल्या. मी माझ्या पक्षाचा सभागृहात सध्या एकच खासदार आहे. माझ्या पक्षाला दहा मिनिटांचा वेळ आहे. त्यामुळे मला बोलू देण्याची विनंती केली. पण, लागलीच दुसऱ्या खासदारांना संधी देऊन मला रोखण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Mahayuti Government : राज्यात १२,४७३ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज!

‘३ मे २०२३ पासून मणिपूरला हिंसाचाराला सुरुवात झाली. हा हिंसाचार तब्बल दोन वर्षापर्यंत सुरु राहिला. पण, याची दखल केंद्र शासनाने तसेच पंतप्रधानांनीही घेतली नाही. तेथून बराच कालावधी लोटल्यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. कारण आपण म्हणतो त्याप्रमाणे ‘मोदी है तो मुमकीन है!’… असे म्हणताच पुढे काही बोलू नयेत म्हणून सभापतींनी भाषण आटोपण्यास सांगितले, असंही काळे म्हणाले.