Breaking

MP Shrikant Shinde : खासदार शिंदेंनी मुख्यमंत्र्यांसह वडिलांचे मानले आभार !

State Governent approves Rs 357 crore water supply scheme 357 : कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मिळाली राज्य शासनाची मंजुरी

Water Supply : कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांसाठी अमृत योजनेंतर्गत 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह 27 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.

केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत आहे. राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

A threat to repeat the Beed incident : तुझा ‘मस्साजोगचा सरपंच’ करेन; धमकी देऊन मारहाण

केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास काय होते, याचा अनुभव गेली अडीच वर्ष महाराष्ट्राने घेतला आहे. यापुढेही जनतेला हा अनुभव येणार आहे. काँग्रेसचे सरकार आजवर साधा पाण्याचाही प्रश्न मिटवू शकले नाही. पण महायुती सरकार सत्तेत येताच राज्यभरातील पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू केले आहे. राज्याच्या कोणत्या भागात कोणती योजना प्रभावी ठरेल, याचा अभ्यास करून योजना मार्गी लावल्या जात आहेत. जनतेचे विचार, मागण्या लक्षात घेऊन काम करणारे हे सरकार असल्याचेही डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.