Nagpur’s intelligence department is selling tickets : ठाणेदार, हवालदार लागले कामाला; प्रत्येकाला दिलेय टार्गेट
Nagpur सुरक्षेला असलेला धोका तपासण्याची जबाबदारी असलेला खुफिया विभाग intelligence department सध्या तिकीट विक्रीमध्ये व्यस्त आहे. फक्त एक विभागच नव्हे तर पोलीस उपायुक्तांपासून ठाणेदारांपर्यंत साऱ्यांनाच सध्या टार्गेट देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांची traffic police चौकातील वसुली आतापर्यंत चर्चेत होती. पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांकडून अधिकृतरित्या पैसे गोळा केले जात आहेत, हे विशेष.
शहर पोलीस विभागाने येत्या २५ जानेवारीला ३ ते २१ किलोमीटर अंतराची अर्धमॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क १ हजार ते ५०० रुपये आहे. मात्र, या स्पर्धेत सामान्य नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक ठाणेदारांना ३०० अर्ज भरून देण्याची सक्ती केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. ठाणेदार मात्र, तिकीट विक्रीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठाणेदाराला ३०० अर्ज भरण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे ठाणेदारांनी ‘डीबी’ पथक आणि ‘खुफीया’ विभागाला कामाला लावले आहे. ‘नागरिकांना भेटा आणि त्यांच्याकडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरून घ्या,’ असे आदेशच ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अर्धेअधिक कर्मचारी मॅरेथॉन स्पर्धेचे अर्ज भरण्यात गुंतले आहेत.
याचा परिणाम पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावर होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्त आणि नाकाबंदीवरही होत आहे. शहरात चोरी, घरफोडी, हत्याकांड, प्राणघातक हल्ल्याच्या घटना आणि वाहनचोरीचे गुन्हे घडत आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचे अर्ज भरण्यातच ठाणेदार व्यस्त असल्याचे चित्र आहे.
National Startup Day : स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद
वॉकी-टॉकीवर तीच चर्चा
रोज किती अर्ज भरले आणि किती पैसे जमा केले, याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी एका पोलीस उपायुक्तांकडे दिली आहे. त्यामुळे दिवसातून पाच ते सात वेळा ‘वॉकीटॉकी’वर उपायुक्तांच्या अर्ज भरण्याबाबत सूचना असतात. त्यामुळे प्रत्येक ठाणेदारांना रोज अर्ज भरल्याबाबत हिशोब सादर करावा लागत आहे.