Breaking

National Food Security Scheme : रेशन कार्ड आहे? मग e-KYC करा, अन्यथा…

e-KYC mandatory for ration card holders : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना अनिवार्य, प्रक्रिया सुलभ केली

Akola राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत (NFSA) शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया आता ‘मेरा केवायसी’ या मोबाईल ॲपद्वारे सहज आणि सोपी झाली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांनी सांगितले. e-KYC केले नाही तर धान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, हे महत्त्वाचे.

गरजू नागरिकांचा धान्यपुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी शासनाने प्रत्येक लाभार्थ्यास ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याकरिता लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांमध्ये (Fair Price Shops) जाऊन ई-पॉस मशिनद्वारे (e-PoS Machine) ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

लाभार्थ्यांना आता रास्त भाव दुकानात न जाता, ‘मेरा केवायसी’ मोबाईल ॲपद्वारे स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी घरबसल्या पूर्ण करता येणार आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (NIC) सहकार्याने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!

राज्यात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन श्री. खेमनार यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA) ही केंद्र सरकारची योजना आहे, जी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देते. या अंतर्गत पात्र कुटुंबांना रास्त भाव दुकानांतून तांदूळ, गहू आणि इतर धान्य कमी दरात दिले जाते.

गरीबीरेषेखालील (BPL) आणि अन्नसुरक्षा योजनेत पात्र ठरलेले शिधापत्रिकाधारक. अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गट (PHH) लाभार्थी. तसेच रास्त भाव दुकानांमधून धान्य घेणारे सर्व पात्र नागरिक. ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी करून या योजनेचा नियमित लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT

ई-केवायसी बंधनकारक केल्याने लाभार्थ्यांची ओळख पडताळली जाते आणि योग्य व्यक्तीपर्यंत धान्य पोहोचते. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी ‘मेरा केवायसी’ हे नवीन मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.