Breaking

Neelam Gorhe : ‘शिवसेना शिंदे गट’ नव्हे, शिवसेना आपलीच !

Neelam Gorhe said that Shiv Sena is not the Shinde group, Shiv Sena is ours : लाडक्या बहीणींना २१०० रुपये अनुदान देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध

Sangli : शिवसेनेच्या वाढीमध्ये आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे योगदान मोठे आहे. अजूनही अनेक जण ‘शिवसेना – शिंदे गट’, असा उल्लेख करतात, हे चुकीचे आहे. पण शिवसेना ही आपलीच आहे. आता गट वगैरे म्हणणे बंद केले पाहिजे. ‘आपली शिवसेना’, हे प्रत्येक कार्यकर्त्यांना मनात ठासवून घेतले पाहिजे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

शिवसेनेच्या महिला आघाडीचा मेळावा नुकताच सांगली येथे पार पडला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाभरातून आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संघटनात्मक बांधीलकी, आरोग्य, सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती महिलांना दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Harshawardhan Sapkal : एकीकडे अभिजात दर्जा द्यायचा अन् दुसरीकडे हिंदीची सक्ती, दुटप्पीपणा चालणार नाही !

लाडकी बहीण सन्मान योजनेतून महिलांसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. १५०० च्या ऐवजी २१०० रुपये अनुदान लाडक्या बहीणींना देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. महिलांना दिलेले वचन पाळणे, हे आमचे कर्तव्य आहे. ज्या बॅंका महिला बचत गटांना सहकार्य करतात, त्यांची यादी देण्याचे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

महिलांसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. यासंदर्भातील माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्या म्हणाल्या, आयर्न तपासणीपासून ते गर्भाशयाबाबतचे महत्व त्यांनी महिलांना पटवून दिले. हिमोग्लोबीन, कॅल्शीयमची पातळी कशी राखली पाहिजे आणि ते का महत्वाचे आहे, हे सुद्धा महिलांना पटवून दिले. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी महिलांना संधी मिळाली पाहिजे. यासाठी महिलांनी तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Yavatmal Administration : नदी काठावरील गावांमध्ये पाणी टंचाई!

जिल्हा संपर्कप्रमुख सुनीता मोरे, रुक्मिणी आंबीगेर, आशा पोतदार, मनीषा पाटील, राणी कमलाकर, अर्चना माळी, ज्योती दांडेकर यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्वागत केले. जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, सह संपर्कप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी आभार मानले.