Breaking

Nitin Gadkari : विदर्भाच्या पंढरीचे रुपडे पालटणार!

Bhoomipujan of development works worth 164 crores in Dhapewada : धापेवाडाच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील १६४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Nagpur विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धापेवाडा येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा आता कायापलट होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १६४.६१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. आणि आज या विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग व नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्या वतीने धापेवाडा येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, सावनेरचे आमदार आशीष देशमुख, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, उमरेडचे आमदार संजय मेश्राम, वारकरी संप्रदायातील श्रीहरी बापू वेळेकर महाराज व यशवंत पराते महाराज यांची उपस्थिती होती.

Nitin Gadkari : गडकरींच्या एका आवाहनावर पोहोचले हजारो भाविक!

धापेवाडा श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान मंदिराचा विकास आराखडा, पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तसेच धापेवाडा येथील नदीचे रुंदीकरण व खोलीकरण या कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिर परिसरात सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आला. यात १६४.६१ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामध्ये संपूर्ण मंदिर परिसराच्या विकासकामांचा समावेश आहे.

विठ्ठल मंदिर परिसरात प्रार्थना सभा, प्रदक्षिणा मार्ग, प्रशासकीय इमारत, कोलबा स्वामी मंदिर परिसराचा विकास, भक्त निवास, चंद्रभागा नदीच्या काठावर स्वामी कोलबास्वामींची ५१ फुटाची मूर्ती या कामांचा समावेश आहे. या कामांतर्गत गर्भगृहाचा आकार वाढविण्यात येईल. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी चंद्रभागा नदीवर नव्या पुलाचे काम होणार आहे.

Nitin Gadkari : गडकरींचे Green Signal! अकोला-महान महामार्ग होणार Four lane

‘दोनशे कोटींचे काम दोन लाख कोटींचे वाटतेय’
हजारो कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो. पण आज धापेवाडा येथे दोनशे कोटींची विकासकामे मला दोन लाख कोटींची वाटत आहे. कारण धापेवाडा हे माझे गाव आहे. आता येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरासह गावाचाही पर्यटन व तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार आहे, गडकरी म्हणाले.