Representation to Gadkari for Kaundanyapur-Arvi road : निवेदनाद्वारे रुंदीकरणाची मागणी, दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग
Amravati कुऱ्हा, कौंडण्यपूर ते आर्वी हा महत्त्वाचा रस्ता माजी आमदार साहेबराव वानखडे मार्डीकर यांच्या प्रयत्नांतून तयार झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी विनोद वानखडे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात अमरावती ते कौंडण्यपूरदरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग अमरावती व वर्धा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा आहे. तो राज्य महामार्ग क्रमांक २०० चा भाग आहे. सध्या या रस्त्याची रुंदी अमरावती ते कौंडण्यपूरदरम्यान ९ मीटर आहे. कौंडण्यपूरपासून वर्धा दिशेने त्याची रुंदी ११ मीटर आहे.
या मार्गावर श्री क्षेत्र कौंडण्यपूर, जहागीरपूर, धामंत्री यासारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे असून, त्यामुळे भाविकांची व वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, अमरावती ते मार्डी दरम्यान सुमारे १४ किलोमीटर अंतरात गोळे वैद्यकीय महाविद्यालय, केंब्रिज स्कूल, इंडो पब्लिक स्कूल, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, गिट्टी क्रेशर, हॉट मिक्स प्लांट, मंगल कार्यालये, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच राज्य राखीव पोलिस दलासाठी नियोजित जागा आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा भार वाढला असून, अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे.
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘चांगला डॉक्टर चांगला माणूसही असावा’!
सध्याची रस्त्याची रुंदी ही वाढत्या वाहतुकीस अपुरी ठरत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती ते कौंडण्यपूर या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करणे गरजेचे आहे, असे मत विनोद साहेबराव वानखडे यांनी व्यक्त केले आहे. या मागणीसंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.